जगन्नाथ मंदिराचा ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने कसा काय फडकतो, हे रहस्य जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 02:49 PM2021-07-06T14:49:37+5:302021-07-06T14:49:54+5:30

ही आख्यायिका हनुमंताशी संबंधित आहे. हनुमंत दहा दिशांचे रक्षण करतात. तिथल्या पावन भूमीशी संबधित अनेक हनुमंत कथा सांगितल्या जातात.

Find out the secret of how the flag of Jagannath Temple flutters in the opposite direction of the wind! | जगन्नाथ मंदिराचा ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने कसा काय फडकतो, हे रहस्य जाणून घ्या!

जगन्नाथ मंदिराचा ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने कसा काय फडकतो, हे रहस्य जाणून घ्या!

googlenewsNext

श्री जगन्नाथ मंदिराच्या वर स्थापित लाल ध्वज नेहमी नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो. याचे वैज्ञानिक कारण अद्याप कळले नसले, तरी त्यामागे पौराणिक कथा नक्कीच आहे. एवढा भव्य दिव्य ध्वज कोणाचेही लक्ष वेधून घेतो आणि विशेषतः प्रवाहाविरुद्ध असलेली त्याची गती सर्वांसाठी औत्सुक्याचे कारण ठरते. हे असे का घडत असावे, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पौरणिक कथा माहीत असणे गरजेचे आहे. ती कथा कोणती? चला पाहूया...

ही आख्यायिका हनुमंताशी संबंधित आहे. हनुमंत दहा दिशांचे रक्षण करतात. तिथल्या पावन भूमीशी संबधित अनेक हनुमंत कथा सांगितल्या जातात. त्यातील एक म्हणजे समुद्राजवळील मंदिराच्या आत समुद्राचा आवाज थांबवणे. हा आवाज थांबविण्यासाठी झेंड्याची दिशा बदलली गेली, अशी या कथेची परस्पर जोड आहे. 

एकदा भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी महर्षी नारद पोहोचले. तिथे त्यांना हनुमंत भेटले.  ते म्हणाले की आता भगवान विश्रांती घेत आहेत, तुम्हाला थांबावे लागेल. नारद दाराबाहेर जाऊन थांबले. थोड्या वेळाने, जेव्हा त्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे पाहिले तेव्हा भगवान जगन्नाथ श्री लक्ष्मीसमवेत दुःखी बसले होते. त्यांनी परमेश्वराला दुःखाचे कारण विचारले तेव्हा जगन्नाथ म्हणाले, की समुद्राचा आवाज कुठे आराम करू देतो?

नारद बाहेर गेले आणि त्यांनी हनुमंताला भगवंताचे हे दुःख सांगितले. हनुमंत त्या आवाजाचा बंदोबस्त करण्यासाठी समुद्राला म्हणाले की, तू इथून निघून जा नाहीतर तू तुझा आवाज थांबव. तुझ्या आवाजामुळे माझे स्वामी विश्रांती घेऊ शकत नाही. हे ऐकून समुद्र देव प्रकट झाले आणि म्हणाले,' हे महावीर हनुमंता ! हा आवाज थांबविणे माझ्या आवाक्यात नाही. हा आवाज वा वाऱ्याच्या वेगामुळे येत आहे. वाऱ्याचा वेग जितका गतीने पुढे जाईल तितक्या वेगाने आवाजनिर्मिती होईल. वाऱ्याचा वेग वळवणे हे माझ्यापेक्षा तुमच्या हातात आहे. कारण मरुत अर्थात वारा हे तुमचे पिताश्री. तुम्ही त्यांना विनवणी करा . 

मग हनुमंतांनी त्यांचे वडील पवनदेव यांना बोलावले आणि सांगितले की तुम्ही मंदिराच्या दिशेने जाऊ नका. यावर पवन देव म्हणाले की मला हे शक्य नाही परंतु मंदिराच्या आवारात तू अशी वर्तुळनिर्मिती कर, जी वायुरहित असेल.'
हे कळल्यावर हनुमंताने स्वतःच्या शरीराचे दोन भाग केले आणि ते वायुपेक्षा अधिक गतीने जगन्नाथ मंदिराच्या सभोवताली वर्तुळाकार फिरले. त्या मंडलामुळे वाऱ्याचा आवाज आत शिरू शकला नाही आणि जगन्नाथ स्वामी आराम करू शकले. 

म्हणून आजतागायत आपण समुद्राद्वारे (मंदिराच्या आतून) कोणताही आवाज मंदिराच्या सिंहद्वारात पहिल्या पायरीवर प्रवेश केल्यावर ऐकू शकत नाही. आपण (मंदिराच्या बाहेरून) एक पायरी ओलांडली तर आपण ते ऐकू शकता. हे संध्याकाळी स्पष्टपणे अनुभवता येते. त्याचप्रमाणे, मंदिराच्या बाहेर स्वर्गीय दरवाजा आहे, जिथे मोक्ष मिळविण्यासाठी मृतदेह जाळले जातात, परंतु जेव्हा आपण मंदिरातून बाहेर पडता तेव्हाच तुम्हाला मृतदेह जाळल्याचा वास येईल.

याच कारणामुळे मंदिर परिसरातील वाऱ्याची दिशा विरुद्ध असल्याने मंदिराच्या कळसावरील ध्वज विरुद्ध दिशेने फडकत राहतो. ते आश्चर्य पाहण्यासाठी अनेक भाविक जगन्नाथाच्या यात्रेत गर्दी करतात. 

Web Title: Find out the secret of how the flag of Jagannath Temple flutters in the opposite direction of the wind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.