शबरीमाला मंदिरातील 'मकरज्योती'चे काय आहे रहस्य, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 12:29 PM2021-07-24T12:29:34+5:302021-07-24T12:30:02+5:30

मकरज्योती हा सूर्यानंतर दुसरा असा तारा आहे, जो सूर्यासारखा प्रखर तेजस्वी आहे. तो तारा मकर संक्रांतीच्या रात्री दिसतो. त्याची पूजा देखील केली जाते.

Find out the secret of 'Makarajyoti' in Sabarimala temple! | शबरीमाला मंदिरातील 'मकरज्योती'चे काय आहे रहस्य, जाणून घ्या!

शबरीमाला मंदिरातील 'मकरज्योती'चे काय आहे रहस्य, जाणून घ्या!

googlenewsNext

आपण हॉलिवूडचे रहस्यमय, थरार चित्रपट चवीने पाहतो. परंतु आपल्या देशात अशा अनेक अद्भूत आणि रहस्यमयी जागा आहेत, ज्यांची नुसती माहिती वाचूनही रोमांच उभे राहतात. तिथे प्रत्यक्षात जाऊन पाहिले तर काय अनुभव असेल याची कल्पनाच केलेली बरी! त्यापैकीच एक आहे, शबरीमाला मंदिर!

>> केरळ येथे स्थित असलेले शबरीमाला मंदिर अयप्पा स्वामींचे  मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात अयप्पा स्वामींच्या दर्शनासाठी केवळ भारतभरातून नव्हे, तर जगभरातून भाविक येतात. भगवान अयप्पा हे भगवान शिवशंकर आणि माता मोहिनी यांचे सुपूत्र आहेत. या मंदिराशी निगडित अनेक रहस्यमय गोष्टी आहेत, त्या कोणत्या हे जाणून घेऊया. 

>> अयप्पा स्वामींच्या मंदिरात मकर संक्रांतिच्या मध्यरात्री एक तेजस्वी प्रकाश दिसतो. तो पाहण्यासाठी भाविक हजारोंच्या संख्येने गर्दी करतात. 
असे म्हटले जाते की या प्रकाशाबरोबर एक प्रकारचा आवाजही तिथे ऐकू येतो. 

>> भाविक सांगतात, की ही ज्योति भगवान शंकरांची खूण आहे. त्याच ज्योतीला 'मकर ज्योती' असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या रात्री मकरज्योती उत्सव असतो. 

>> मकरज्योती हा सूर्यानंतर दुसरा असा तारा आहे, जो सूर्यासारखा प्रखर तेजस्वी आहे. तो तारा मकर संक्रांतीच्या रात्री दिसतो. त्याची पूजा देखील केली जाते. 

>> हा तारा एरव्हीच्या तुलनेत त्या रात्री प्रखरपणे दिसतो. तो दिवस अयप्पा स्वामींच्या उत्सवाचा दिवस असल्याने त्या ताऱ्याची पूजा केली जाते. स्वामी अयप्पा हे खरे पाहता एक योगी आहेत, परंतु उत्सवाच्या दिवशी आभुषण, वस्त्र घालून त्यांना राजकुमारासारखे सजवले जाते. 

या ठिकाणी कसे व कधी जाता येईल? 

  • वर्षभरात या ठिकाणी कधीही जाता येते, परंतु उत्सवाच्या वेळी या मंदिराचे रूप पालटलेले असते. तिरुअनंतपुरम येथून खाजगी वाहनाने शबरीमाला मंदिराच्या दिशेने जाता येते.
  • हे मंदिर उंचावर आहे. १५३५ फूट डोंगर पायऱ्या चढून झाल्यावर अयप्पा स्वामींचे दर्शन घडते. 
  • रेल्वेने जाणार असाल तर कोट्टयम किंवा चेंगन्नूर ही रेल्वेस्थानके जवळ पडतात. आणि विमानाने जाणार असाल तर तिरुअनंतपुरम हे विमानतळ गाठता येईल.

Web Title: Find out the secret of 'Makarajyoti' in Sabarimala temple!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.