वास्तुदोष कशामुळे निर्माण होतो व कशाने दूर होतो, जाणून घ्या.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 03:20 PM2021-05-19T15:20:57+5:302021-05-19T15:21:16+5:30
सर्व सोयीने युक्त घरे बांधताना असणारे नियम, सिद्धांत सांगणारे शास्त्र म्हणजे वास्तूशास्त्र होय. आपल्या वास्तूतील दोष दूर करण्यासाठी त्याचा वापर जरूर करावा.
घर घेताना शेजार पाजार, पाण्याची व्यवस्था, निसर्गसौंदर्य, वाहतुकीची सोय या सर्वांचा विचार केला जातो. पण जागेच्या गुणवत्तेसंबंधी विचार करताना वास्तुशास्त्र तज्ज्ञ आणि ज्योतिषशास्त्र जाणणाऱ्यांचा सल्ला उपयुक्त ठरतो.
नदी श्रोतियों राजा दैवज्ञो न चिकित्सक:,
तत्र वासो न कर्तव्य...
ज्या ठिकाणी नदी, जलाशय, विहीर, विद्वान, ज्योतिष, शासक, वैद्य नसतील अशा ठिकाणी राहू नये. अशा ठिकाणचा त्याग करावा. आजच्या भाषेत जिथे नगर रचना नसेल, नागरी सुविधा नसतील, नागरी योजना नसेल, अशा ठिकाणी वास्तू उभारून उपयोग नाही.
दुष्ट भार्या शठम मित्रं भृत्यशोत्तर दायक:
ससर्पे च गृहे वासो मृत्युदेव न संशय:
दुष्ट पत्नी, मूर्ख मित्र, उलट उत्तर देणारा सेवक आणि साप ज्या घरात राहत असतील, त्या घरातल्या कुटुंब प्रमुखाचा कोणत्याही क्षणी मृत्यू निश्चित असतो. मृत्यू या शब्दाचा अर्थ संकट या अर्थी समजून घेऊया. त्यामुळे घराशी मानसिक अशांतता, त्रास, वाद यांचा जवळचा संबंध येतो. घरात शुभ, सुख समाधान लाभावे अशी इच्छा असेल तर वाईट गोष्टींवर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार घराची दारे, त्यांच्या दिशा, इ गोष्टींचा विचार आणि त्यानुसार कृती केली असता संकटाचे प्राबल्य कमी होते आणि वास्तू त्या अरिष्ट गोष्टींना दूर ठेवते.
भूमीवर वसवली जाणारी गावे, मंदिरे आणि सर्व सोयीने युक्त घरे बांधताना असणारे नियम, सिद्धांत सांगणारे शास्त्र म्हणजे वास्तूशास्त्र होय. आपल्या वास्तूतील दोष दूर करण्यासाठी त्याचा वापर जरूर करावा.