झोपेत पाहिलेली कोणती स्वप्ने खरी होतात आणि कोणती खोटी ठरतात, ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 03:01 PM2021-07-02T15:01:10+5:302021-07-02T15:01:28+5:30

अनिश्चित स्वप्नांबाबत स्वप्नज्योतिष शास्त्राने काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांशी आपल्या स्वप्नांचा मेळ घालून पहावा, म्हणजे अर्थबोध होण्यास मदत होते.

Find out what dreams come true and what dreams not come true! | झोपेत पाहिलेली कोणती स्वप्ने खरी होतात आणि कोणती खोटी ठरतात, ते जाणून घ्या!

झोपेत पाहिलेली कोणती स्वप्ने खरी होतात आणि कोणती खोटी ठरतात, ते जाणून घ्या!

googlenewsNext

स्वप्नं सगळ्यांना पडतात. काही जणांना ती आठवतात तर काहींना आठवत नाहीत, एवढाच काय तो फरक! काही जण स्वप्नांचा अति विचार करतात, काही जण गमतीने आठवून सोडून देतात. आपल्याला स्वप्नांच्या मुळाशी जायचे नसले, तरी स्वप्न मालिका आपल्याला काय सूचित करत आहे, हे जाणून घेणे रोचक ठरते. बहुतेक स्वप्नांचा संबंध आपल्या दैनंदिन आयुष्यातील घडणाऱ्या घटना, व्यक्ती, संवाद, निसर्ग, देवता इ गोष्टींशी असतो. परंतु कधी कधी काही असंबद्ध स्वप्नं पडतात, ज्याचा आपण बराच काळ अर्थ लावत बसतो. जसे की बऱ्याच दिवसांत, वर्षांत संपर्कात असलेली व्यक्ती दिसणे, कधीही गेलो नाही असे ठिकाण, मंदिर, निसर्ग किंवा तत्सम गोष्टी दिसणे. या घटना दिसण्यामागे काही संकेत असू शकतात. परंतु या अनिश्चित स्वप्नांबाबत स्वप्नज्योतिष शास्त्राने काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांशी आपल्या स्वप्नांचा मेळ घालून पहावा, म्हणजे अर्थबोध होण्यास मदत होते. त्या सूचना पुढीलप्रमाणे - 

>> जी स्वप्ने दिवसा झोपी गेल्यावर पडतात, त्यांची फळे मिळत नाहीत. म्हणजे त्या स्वप्नांचा जीवनाच्या घडामोडींशी बिलकुल संबंध नसतो. 

>> जे स्वप्न सकाळी उठल्यावर लक्षात राहत नाही, त्या स्वप्नांचा जीवनाशी घडलेल्या घटनांचा संबंध नसतो. 

>> जे स्वप्न लांबलचक व निरनिराळ्या तुटक तुटक दृश्याने पडते, तेही खरे नसते. 

>> भीतीमुळे किंवा चिंतेमुळे जे स्वप्न पडते ते अनिश्चित असते. परंतु ते स्वप्न आत्मिक बळाने पाहिलेले असते ते खरे असते. ईश्वराची भक्ती करून दुसऱ्या दिवशी रात्री तीच मूर्ती दिसणे हे शुभ फलदायक असते. तसेच इच्छापूर्तीचे ते लक्षण असते. 

>> पहिले वाईट स्वप्न पडून नंतर चांगले स्वप्न पडले तर त्या वाईट स्वप्नाचा काहीएक परिणाम होत नाही आणि त्या स्वप्नाचा आपल्या आयुष्याशी संबंधही येत नाही. 

Web Title: Find out what dreams come true and what dreams not come true!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.