शरीराच्या कोणत्या भागावर असलेली जन्मखूण लाभदायक ठरते, ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 12:59 PM2022-06-07T12:59:52+5:302022-06-07T13:00:04+5:30

जन्मखूण ही आपली ओळख असते. मात्र समुद्र शास्त्रानुसार ती शरीराच्या विशिष्ट भागावर असेल तर आपले नशीब आपल्याला साथ देते. 

Find out which part of the body the birthmark is beneficial on! | शरीराच्या कोणत्या भागावर असलेली जन्मखूण लाभदायक ठरते, ते जाणून घ्या!

शरीराच्या कोणत्या भागावर असलेली जन्मखूण लाभदायक ठरते, ते जाणून घ्या!

googlenewsNext

हाताच्या रेषा, शरीरावरील तीळ, अवयवांची रचना व्यक्तीच्या भविष्याबद्दल बरेच काही भाकीत वर्तवतात. त्याचप्रमाणे जन्मापासून शरीरावर बनलेल्या खुणाही विशेष संकेत देतात. जन्मखुणादेखील आपले भाकीत चांगले आहे की वाईट याचा खुलासा करतात. या जन्मखुणा काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या असू शकतात आणि चेहऱ्यापासून पायापर्यंत कुठेही असू शकतात. काही लोकांच्या शरीरावरील जन्मखुणा विरळ असतात तर काही जणांच्या अगदी ठळकपणे दिसतात. आज आपण समुद्र शास्त्रात नमूद केलेल्या जन्मखुणांबद्दल जाणून घेऊया.

>>ज्या लोकांच्या चेहऱ्यावर जन्मखूण असते, त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. ते खूप भावनिक असतात. असे लोक आरामदायी आणि आनंदी जीवन जगतात.

>>जर डाव्या गालावर जन्मखूण असेल तर असे लोक अनेकदा उदास असतात आणि त्रासांनी वेढलेले असतात. तर, उजव्या गालावर जन्मखूण असणारे लोक अतिशय मेहनती असतात. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. 

>>हातावर जन्मखूण असणारी व्यक्ती आपल्या कुटुंबाला पूर्णपणे समर्पित असते. अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात खूप मान-सन्मान मिळतो.

>>जन्मापासून हाताच्या बोटावर खूण असलेल्या व्‍यक्‍तीचे विचार आणि कृती बंधनमुक्त असते. असे लोक कोणावरही अवलंबून नसतात.

>>पाठीवर जन्मखूण असेल तर ती व्यक्ती मेहनती आणि प्रामाणिक असते. यासोबतच स्वतःच्या गुणांच्या जोरावर वेगळी ओळखही निर्माण करते.

>>ज्या लोकांच्या छातीवर जन्मखूण असते असे लोक खूप भाग्यवान असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळते. ते नेहमी आनंदी राहतात आणि आजूबाजूच्या लोकांनाही आनंदी ठेवतात.

>>पोटावर जन्मखूण असलेली व्यक्ती पक्की खवय्यी असते. अशा लोकांना खाण्यापिण्याची खूप आवड असते. 

>>मांडीवर जन्मखूण असणे देखील भाग्यवान असल्याचे लक्षण आहे. अशा लोकांना नेहमी यश आणि प्रगती मिळते.

>>पायावर, तळव्यावर जन्मखूण असणे कष्टप्रद जीवन दर्शवते. अशा लोकांचे आयुष्य संघर्षमयी व्यतीत होते. 

Web Title: Find out which part of the body the birthmark is beneficial on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.