सर्वांशी मैत्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 05:15 AM2020-10-10T05:15:15+5:302020-10-10T05:15:29+5:30

मी कायम सुखी असो, मी शांत असो, मी आनंदित असो आणि मला मुक्ती मिळो.

Friendship with everyone! | सर्वांशी मैत्री!

सर्वांशी मैत्री!

Next

- धनंजय जोशी

पाली भाषेमध्ये टी३३ं म्हणून शब्द आहे. त्याचा अर्थ मैत्री भावना किंवा सर्वांबद्दल प्रेम भावना मानणे. इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे लव्हिंग- काइंडनेस!
ज्ञान शिबिरामध्ये ही भावना अंत:करणामध्ये जागृत ठेवून कसे जगायचे हे शिकवले जाते. विपश्यना शिबिरात त्याचा नियमित उपयोग होतो. ही भावना आचरणात कशी आणावी हे सोपे काम आहे. तीन किंवा चार वाक्ये मनात ठेवावी. ती कोणती?

मी कायम सुखी असो, मी शांत असो, मी आनंदित असो आणि मला मुक्ती मिळो. पहिल्यांदा मी, नंतर आपल्याजवळ जे आहेत ते, नंतर अगदी आपल्याला न आवडणारे जे आहेत ते, त्यानंतर सर्व प्राणिमात्र, अशा सर्वांना शांती, आनंद आणि मुक्ती मिळो ही भावना मनात ठेवून ध्यान करायचे. आपण जर रोज अगदी दहा मिनिटे जरी अशी साधना केली तर आपले जीवन संपूर्ण बदलून जाऊ शकेल. मला नेहेमी वाटते की आपण हे फक्त जीवितांसाठीच का करतो? घरात वावरताना आपण जरा लक्ष देऊन बघावे. आपण रेफ्रीजरेटरचे दार हळू, काळजीपूर्वक, प्रेमाने उघडतो की काहीही विचार न करता? आपण खुर्चीवर बसताना तिचे आभार मानून मग बसतो की तसेच? प्रत्येक क्रिया अशा प्रेमाने का नाही करता येत आपल्याला? माझ्या मित्राने नवीन मर्सिडिज बेंझ गाडी घेतली. त्यातले सगळे फीचर बघून थक्क झालो; पण एक गोष्ट मला अत्यंत आवडली. गाडीचे दार बंद करताना तुम्ही फक्त ते दार जरा जवळ आणायचे आणि ते आपोआप शांतपणे बंद होते. धाडदिशी आपटायची जरूर नाही. मनात विचार आला, ज्या इंजिनिअरने ते डिझाइन केले तो नक्कीच झेन साधक असावा!

Web Title: Friendship with everyone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.