Ganesh Chaturthi 2022: १० वर्षांनी गणेश चतुर्थीला अद्भूत योग: भक्तांच्या मनोकामना बाप्पा पूर्ण करणार; सर्व शुभ होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 10:30 AM2022-08-25T10:30:46+5:302022-08-25T10:32:42+5:30

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला जुळून आलेल्या दुर्मिळ योगात केलेले गणेश पूजन अतिशय शुभ-लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. नेमके कोण योग जुळून आलेत? जाणून घ्या...

ganesh chaturthi 2022 know about significance of these 3 auspicious yoga came after 10 years on occasion of ganeshotsav 2022 | Ganesh Chaturthi 2022: १० वर्षांनी गणेश चतुर्थीला अद्भूत योग: भक्तांच्या मनोकामना बाप्पा पूर्ण करणार; सर्व शुभ होणार!

Ganesh Chaturthi 2022: १० वर्षांनी गणेश चतुर्थीला अद्भूत योग: भक्तांच्या मनोकामना बाप्पा पूर्ण करणार; सर्व शुभ होणार!

googlenewsNext

चातुर्मासातील दुसरा महिना म्हणजे भाद्रपद. याचे वैदिक नाव नभस्य असे आहे. मात्र, या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र पूर्वा किंवा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राजवळ असतो म्हणून या महिन्याला भाद्रपद हे नाव दिले आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी सिद्धिविनायकी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. तर भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी मानली जाते. यंदाच्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून, अद्भूत शुभ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया... (ganesh chaturthi 2022)

मराठी वर्षात गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. पैकी भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून पुढे १० दिवस गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. (ganeshotsav 2022)

१० वर्षांनी गणेश चतुर्थीला अद्भूत योग

या वर्षी गणेशभक्तांसाठी आनंदाची बाब आहे की, शास्त्रात गणेशाच्या जन्मवेळेबद्दल सांगितल्याप्रमाणे असा काही योगायोग घडला आहे. असाच एक शुभ योगायोग १० वर्षांपूर्वी २०१२ मध्ये जुळून आला होता. गणेश पुराणात भाद्र शुक्ल चतुर्थीच्या दिवशी मध्यान्हीला गणेशाचा जन्म झाल्याचे सांगितले आहे. गणेशाचा जन्म झाला तो दिवस बुधवार होता, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. यावेळीही असाच काहीसा योगायोग जुळून येत आहे.

- भाद्रपद शुद्ध चतुर्थी तिथी बुधवारी आहे. चतुर्थी तिथी मंगळवार, ३० ऑगस्ट रोजी दुपाली ३ वाजून ३४ मिनिटांपासून सुरू होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ०३ वाजून २३ मिनिटांपर्यंत राहील. ३१ ऑगस्ट रोजी सूर्योदयाला चतुर्थी तिथी आणि मध्यान्ह व्यापिनी चतुर्थी तिथी असल्याने या दिवशी गणेश चतुर्थीचे व्रताचरण केले जाऊ शकते. धार्मिक दृष्टिकोनातून हा अतिशय शुभ योगायोग आहे. या शुभ मुहूर्तावर गणेशाची आराधना करणे भक्तांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. (auspicious yoga on ganesh chaturthi 2022)

रवियोग आणि ग्रहांची शुभ स्थिती

गणेश चतुर्थी ३१ ऑगस्टला असून, १० वर्षांपूर्वीचा रवियोग असेल. या योगाला तुम्ही दुग्ध शर्करा योग म्हणू शकता, कारण गणेशाच्या आगमनाने सर्व अडथळे दूर होतात, त्यावर रवियोग असणे अधिक शुभ आहे कारण रवियोग हा अशुभ योगांचा प्रभाव नष्ट करणाराही मानला जातो. यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र हा बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीत असेल. शुक्र कर्क राशीतून सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करेल. या दिवशी शुक्र संक्रांती असेल. गुरु आपल्या राशीत मीन राशीत असेल. शनी स्वराशीत म्हणजेच मकर असेल. सूर्य आपलेच स्वामित्व असलेल्या सिंह राशीत असेल. बुधही आपल्याच म्हणजे कन्या राशीत असेल. म्हणजेच या दिवशी चार ग्रह स्वराशीत असतील. ग्रह नक्षत्रांचा हा संयोग भक्तांसाठीही शुभ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: ganesh chaturthi 2022 know about significance of these 3 auspicious yoga came after 10 years on occasion of ganeshotsav 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.