गणेश चतुर्थी: गणेशोत्सवात ३ मंत्रांचा करा जप, इच्छापूर्तीसह दीर्घायुष्य, गणराय होईल प्रसन्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 07:00 AM2023-09-18T07:00:07+5:302023-09-18T07:00:07+5:30

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सव काळात काही मंत्रांचा यथाशक्त जप केल्याचा विशेष लाभ मिळू शकतो. कोणते मंत्र म्हणावेत?

ganesh chaturthi 2023 chant these 3 mantra and shloka of lord ganesha during ganesh utsav and get blessings of ganpati bappa | गणेश चतुर्थी: गणेशोत्सवात ३ मंत्रांचा करा जप, इच्छापूर्तीसह दीर्घायुष्य, गणराय होईल प्रसन्न!

गणेश चतुर्थी: गणेशोत्सवात ३ मंत्रांचा करा जप, इच्छापूर्तीसह दीर्घायुष्य, गणराय होईल प्रसन्न!

googlenewsNext

Ganesh Chaturthi 2023: भाद्रपद चतुर्थीला कोट्यवधी घरांमध्ये गणेशाची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सव हा चैतन्याचा, उत्साहाचा आणि आनंददायक काळ असतो. मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी अंगारक योगात गणेश चतुर्थी आहे. गणपतीत आपापले कुळाचार, कुळाधर्म, परंपरा सांभाळून यथाशक्ती गणपतीची सेवा करतो. बुद्धिदाता गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर असावी, घरात सुख, समृद्धी, शांतता नांदावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. गणपतीसाठी आवडीच्या गोष्टींचा नैवेद्य केला जातो. मनोभावे पूजन, नामस्मरण, उपासना, आराधना केली जाते. विविध पद्धतीचे श्लोक, स्तोत्र पठण वा श्रवण केली जातात. यातच काही मंत्र सांगण्यात आले आहेत, जे गणेशोत्सव काळात म्हटल्यास उत्तम लाभ मिळू शकतो, असे म्हटले जाते. (Ganesh Chaturthi 2023 Mantra)

गणेशोत्सवात गणपती बाप्पाशी निगडीत विविध प्रकारची स्तोत्र, श्लोक आवर्जून म्हटले जातात. अथर्वशीर्ष हे प्रभावी स्तोत्र मानले गेले असून, गणपतीत याची आवर्तने केली जातात. नोकरी, व्यवसाय, करिअर, कुटुंब, आर्थिक आघाडीवर प्रगती, सुख- समृद्धी यावी, संकट दूर करण्यासाठी गणरायाकडे साकडे घातले जाते. गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवात काही मंत्राचा जप शुभ मानला गेला आहे. या मंत्रांचा यथाशक्ती किंवा २१ वेळा जप केल्यास गणपती बाप्पा प्रसन्न होतो, असे मानले जाते. पण शक्य नसल्यास तुम्ही दिवासातून एकदा तरी या मंत्रांचा जप आवर्जून करा, असे म्हटले जाते. पण हे मंत्र जपताना त्याचे उच्चारण नीट करा, असा सल्ला दिला जातो.

कोणत्या मंत्रांचा जप करावा?

- गणेश मनोकामना पूर्ती मंत्र: ॐ गं गणपतये नमः

- गणेश गायत्री मंत्र: ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात्।

- विशेष इच्छा पूर्ती मंत्र: ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरु गणेश, ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, मेरे दूर करो क्लेश.

- गणपतीला प्रसन्न करण्याचा श्लोक: वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

- दीर्घायुष्य प्राप्तीसाठी: गणपती स्तोत्र पठण वा श्रवण करावे. 

- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.


 

Web Title: ganesh chaturthi 2023 chant these 3 mantra and shloka of lord ganesha during ganesh utsav and get blessings of ganpati bappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.