Ganesh Chaturthi 2023: २१ पत्री आणायच्या कोठून? पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पती होऊ लागल्या आहेत दुर्मीळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:07 PM2023-09-25T12:07:32+5:302023-09-25T12:09:00+5:30

Ganesh Chaturthi 2023: हरतालिका असो नाहीतर गणेशोत्सव, त्यावेळेस पत्री वाहिल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते, पण ही पत्री भविष्यात मिळणार तरी का, हा मोठा प्रश्न आहे!

Ganesh Chaturthi 2023: Where to get 21 Patri? Plants used for worship are becoming rare | Ganesh Chaturthi 2023: २१ पत्री आणायच्या कोठून? पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पती होऊ लागल्या आहेत दुर्मीळ

Ganesh Chaturthi 2023: २१ पत्री आणायच्या कोठून? पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पती होऊ लागल्या आहेत दुर्मीळ

googlenewsNext

श्रावण महिना आणि त्यानंतर येणाऱ्या सणांच्या दिवशी पूजेसाठी अनेक वनस्पती वापरल्या जातात. या वनस्पती आता दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. मुंबईच्या बाजारात या वनस्पती विक्रीसाठी येतात मात्र तुलनेने हे प्रमाण कमी आहे. शिवाय त्यासाठी पैसे मोजावे लागतात ते वेगळे. पैसे मोजूनही त्या वनस्पती मिळतील की नाही? याचीही शाश्वती नसते. कारण अशा वनस्पती ओरबडल्याने त्या औषधालाही राहतील की नाही? याची शंका असल्याचे म्हणणे वनस्पती तज्ज्ञांनी मांडले आहे.

  • तुळस - तुळशीमध्ये दाहक विरोधी आणि कफ पाडणारे गुणधर्म आहेत. ज्यामुळे ते श्वसनाच्या आजारांवर फायदेशीर ठरते.
  • धोत्रा - कानाचे दुखणे, सूज या समस्यांमध्ये धोतऱ्याच्या फळाचा उपयोग होतो. धोतऱ्याच्या फळात अँटी इन्फ्लेमेट्री आणि अँटीसेप्टिकचे गुण असतात.
  • आघाडा - दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात.
  • डोरली -  दाढ किडल्यास, ज्वरावर, मुत्राघातावर, खोकल्यावर, दम्यामध्ये, श्वासनलिकेची सूज, फुप्फुसाची सूज, श्वसनाचे विकार सर्दी, पडसे, खोकला, दमा, स्वरभंग, जीर्णज्वर अशा विकारांवर काटे रिंगणी फार उपयोगी ठरते.
  • शमी - औषधी म्हणून दमा, कोड व मनोविकारामध्ये सालीची पूड, काढा गुणकारी असल्याचे ऐकण्यात आहे.
  • माका - माका मुख्य क्रिया यकृतावर होत असते. यकृताची विनिमयक्रिया सुधारते, पित्तस्राव नीट होतो, आमाशयांतील आणि पक्वाशयांतील पचनक्रिया सुधारते.  
  • गोकर्णी - वनस्पती शीतल, मूत्रल व कृमिनाशक असते. डोळ्यांचे विकार व डोकेदुखी यांवर वेदनाशामक म्हणून मूळ उपयुक्त असते.

औषधी गुणधर्मयुक्त वनस्पती आपला पारंपरिक ठेवा आहेत. त्या अतिरिक्त प्रमाणात तोडल्याने हळूहळू लुप्त होऊन जातील आणि आपलेच नुकसान होईल. वनस्पती स्थानिक जैव साखळीचा महत्त्वाचा दुवा आहेत. अनेक प्रकारचे मातीमध्ये असलेले सूक्ष्म जंतू, वनस्पतीवर अवलंबून असलेले कीटक, धान्य पिकावर वाढणाऱ्या किडी नियंत्रित करणारे मित्र किटक, फुलपाखरे, पक्षी यांनी मिळून अन्न साखळी व जैव साखळी यांचा समतोल निसर्ग साधतो. त्यामुळे या वनस्पती जपल्या पाहिजेत. संवर्धन केले पाहिजे.
- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक, मुंबई महापालिका

Web Title: Ganesh Chaturthi 2023: Where to get 21 Patri? Plants used for worship are becoming rare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.