बाप्पाच्या आगमनावेळी शुभ मुहुर्ताची गरज नाही! शास्त्र काय सांगते? वाचा सविस्तर नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 03:03 PM2024-09-01T15:03:03+5:302024-09-01T15:03:03+5:30

Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पा आगमनासंदर्भात अनेकांच्या मनात काही शंका असतात. त्याचे समाधान शास्त्रात मिळते, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

ganesh chaturthi 2024 know about is there shubh muhurat and auspicious timing to bring ganpati bappa at home in ganesh utsav 2024 | बाप्पाच्या आगमनावेळी शुभ मुहुर्ताची गरज नाही! शास्त्र काय सांगते? वाचा सविस्तर नियमावली

बाप्पाच्या आगमनावेळी शुभ मुहुर्ताची गरज नाही! शास्त्र काय सांगते? वाचा सविस्तर नियमावली

Ganesh Chaturthi 2024: अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणपतीची तयारी करण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या गणपतीत काय करावे अन् काय नको, असे अनेकांना झाले आहे. श्री गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव हा मराठी महिन्यातील मोठा सण मानला जातो. देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणूनच साजरा केला जातो. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे महत्त्व, महात्म्य आणि परंपरा अनन्य साधारण आहे. गणपती आगमनाची वेळ आणि त्याबाबत काहींच्या मनात शंका असते. गणपती कधी आणावा, शास्त्र काय सांगते, याबाबतच्या शंकांचे समाधान काही पंचांगात आढळून येते. जाणून घेऊया...

यंदा, शनिवार, ०७ सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. भाद्रपदातील श्री गणेश चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. श्री गणेश चतुर्थी व्रत हे ‘सिद्धीविनायक व्रत’ या नावाने ओळखले जाते, असे म्हणतात. गणपती आगमन आणि गौरी पूजन याबाबत शास्त्रात काही गोष्टी आढळून येतात. 

श्रीगणेश उत्सवासंबंधीचे शंका-समाधान

- श्रीगणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीच्या ८ ते १० दिवस आधी घरी आणून ठेवता येते. ती आदल्या दिवशीच घरी आणावी असे नाही, तसेच मूर्ती बाजारातून घरी आणण्यासाठी दिवस पाहण्याची आवश्यकता नसते.

- भाद्रपद महिन्यामधील पार्थिव गणेश स्थापना व पूजन करणेसाठी विशिष्ट वेळ, मुहूर्त नाही. प्रातःकालापासून मध्यान्हापर्यंत (अंदाजे दु. १:३० पर्यंत) कोणत्याही वेळी स्थापना सा व पूजन करता येते.

- उजव्या सोडेंचा गणपती कडक सोवळ्याचा आणि डाव्या सोडेंचा सौम्य अशी समजूत करुन घेणे चुकीचे आहे.

- भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी श्री गणेश स्थापना/पूजन करणे शक्य झाले नसल्यास त्यानंतर करु नये. एखाद्या वर्षी लोप झालेला चालेल.

- गणपती स्थापना झाल्यावर अशौच आल्यास दुसऱ्याकडून लगेच गणपती विसर्जन करुन घ्यावे. एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झालेले चालतील.

- घरामध्ये गर्भवती श्री असता गणेश मूर्तीचे विसर्जन करता येते. अशा वेळेस मूर्ती विसर्जन न करण्याची रुढी गैरसमजुतीमुळे आहे.

- प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यांतून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे, असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी.

गणपतीतील गौरीपूजन आणि काही महत्त्वाच्या गोष्टी

- भाद्रपदातील गौरी काहीजणांकडे उभ्या असतात, तांब्यावर, सुगडावर किंवा खड्यांच्या असतात. जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे गौरीपूजन करावे.

- घरातील एखादी व्यक्ती विशेषतः आई किंवा वडील मृत झाल्यावर एक वर्षाचे आत (नेहमीप्रमाणे) कुलाचाराप्रमाणे गौरी पूजन करावे. काही ठिकाणी अशा वेळेस गौरी उभ्या न करता पाटावर, सुगडावर बसविण्यास सांगितले जाते, यास कोणताही आधार नाही. केवळ भावनेपोटी आणि गैरसमजुतीमुळे सांगितले जाते. अशा वेळेस उभ्या गौरींचे पूजन नेहमीप्रमाणे करावे.

- भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राचे दिवशी गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करता येते.

- अनेकांकडे गौरीपुढे नैवेद्य दाखवून ता दिवसभर ठेवून दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे पण ताट तसेच ठेवून दुसरे दिवशी प्रसाद घेणे योग्य वाटत नाही. कारण कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो.

- यासंबंधी दाते पंचांगात काही माहिती दिलेली असून, असे असले तरी प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे, आपापल्या कुळाचार, कुळधर्माप्रमाणे गणपती आगमन, पूजन, गौरी आवाहन, पूजन करावे, असे सांगितले जात आहे. 

||गणपती बाप्पा मोरया||

 

Web Title: ganesh chaturthi 2024 know about is there shubh muhurat and auspicious timing to bring ganpati bappa at home in ganesh utsav 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.