भाद्रपद मासारंभ: पार्थिव गणपती पूजनाची तयारी केली का? ‘हे’ साहित्य आवश्यकच; पाहा, यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 03:03 PM2024-09-03T15:03:03+5:302024-09-03T15:03:03+5:30

Ganesh Chaturthi 2024: गणपती आगमन आणि पूजनाच्या तयारीची लगबग सुरू आहे. आवश्यक साहित्य घेतलेय ना, याची खात्री करून घ्या...

ganesh chaturthi 2024 parthiv ganesh pujan ganpati aagman tayari ganesh puja sahitya list in marathi | भाद्रपद मासारंभ: पार्थिव गणपती पूजनाची तयारी केली का? ‘हे’ साहित्य आवश्यकच; पाहा, यादी

भाद्रपद मासारंभ: पार्थिव गणपती पूजनाची तयारी केली का? ‘हे’ साहित्य आवश्यकच; पाहा, यादी

Ganesh Chaturthi 2024: चातुर्मासातील भाद्रपद महिना सुरू झाला आहे. गणपती आगमनाचे वेध सर्वांना लागले आहेत. अनेक जण आपापल्या गावी पोहोचून तयारीला लागले आहेत. बाजारात गणपती साहित्य, पूजा साहित्य घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. गणपती आगमन आणि पूजनासाठी नेमके काय काय लागणार, याच्या याद्या करायला सुरुवात झाली आहे. पार्थिव गणपती पूजनात कोणते साहित्य आवश्यक असते? गणपती पूजनाची तयारी कशी करावी? जाणून घेऊया...

केवळ महाराष्ट्र, भारत नव्हे तर जगभरात गणपती उत्सवाची धूम, उत्साह, चैतन्य असते. यंदा शनिवार, ०७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. गणपतीच्या आवडीचे पदार्थ नैवेद्याला केले जातात. दरवर्षी डेकोरेशनमध्ये वैविध्य आणण्यासाठी सर्जनशीलतेची कसोटी लागते. आपापल्या परिने लाडक्या गणेशाच्या आगमनाची तयारी केली जाते. परंतु, पार्थिव गणपती पूजन करताना काही गोष्टी आवश्यक मानल्या गेल्या आहेत. गणेश चतुर्थीपूर्वीच या वस्तू आणून ठेवल्यास ऐनवेळी धावपळ आणि गडबड होणार नाही. (Ganesh Chaturthi Puja Sahitya) 

पार्थिव गणेश पूजनाची तयारी कशी करावी?

श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी श्रींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बाजारातून खाली नमूद केलेल्या गोष्टी आणाव्यात. हे पूजेचे साहित्य निवडून, स्वच्छ करून पूजेच्या थाळीत, तबकांत, टोपल्यात नीट लावून ठेवावे, असे सांगितले जाते.

पार्थिव गणेश पूजनाच्या तयारीचे साहित्य

- पाट किंवा चौरंग, आसन, आसन वा चौरंगावर ठेवण्यासाठी वस्त्र. रांगोळी, समई, निरांजने, पंचारती, वाती, फुलवाती, आरतीसाठी तबक, उदबत्तीचे घर, धूप लावण्यासाठी स्टॅंन्ड, विड्याची पाने, सुट्टे पैसे, सुपारी, फळे, श्रीफळ, नारळ, नैवेद्य व प्रसाद वाटपासाठी वस्तू (वाट्या, चमचा, तबक इ.) (Shree Ganesh Chaturthi Parthiv Ganesh Puja Sahitya)

पार्थिव गणपती पूजेसाठी लागणारे साहित्य

- ताम्हण, पळी-पंचपात्री, अष्टगंध डबी, शेंदूर डबी, बुक्का, हळदकुंकू, गुलाल, फुले, निवडलेल्या दूर्वांची २१-२१ ची बांधलेली जुडी, विड्याची पाने १५, गूळ, खोबरें, पंचामृत- साहित्य (दूध, दही, तूप, मध, साखर) गंध, अत्तर जानवे, उदबत्ती, एकारती, आरतीसाठी पंचारती, कापूर, १ नारळ, खारीक, बदाम, फळे, फुले पुढीलप्रमाणे : लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक.

२१ प्रकारची पत्री: १) मोगरा. २) माका. ३) बेलाचे पान. (४) दूर्वा. ५) बोरीचे पान. ६) धोत्र्याचे पान. ७) तुळस. ८) शमी. ९) आघाडा.  १०) डोरली. ११) कण्हेर. १२) रुई. १३) अर्जुनसादडा. १४) विष्णुकांता. १५) डाळिंब. १६) देवदार. १७) मरुवा. १८) पिंपळ. १९) जाई. २०) केवडा. २१) अगस्तिपत्र. (Shree Ganesh Chaturthi Parthiv Ganpati Puja Sahitya In Marathi)

अन्य महत्त्वाचे साहित्य: गूळ, खोबरे बारीक किसून खसखस, खडीसाखर, खजूर-बेदाण्यासह पंचखाद्य (वाटी किंवा अधिक प्रसाद वाटण्यासाठी), उकडलेले / तळलेले अगर खव्याचे (पेढे) मोदक - २१ (घरातील परंपरेनुसार नैवेद्यासाठी मोदक), गणपतीसाठी लाल/भगव्या रंगाचे नवीन वस्त्र. अन्य साहित्य आपापल्या परंपरा, कुळाचार, कुळधर्म यांप्रमाणे घ्यावे, असे सांगितले जाते.

||गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||
 

Web Title: ganesh chaturthi 2024 parthiv ganesh pujan ganpati aagman tayari ganesh puja sahitya list in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.