गणेश चतुर्थी: मराठीत गणपती संकटनाशनं स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; बाप्पा इच्छापूर्ती करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 06:58 PM2024-09-06T18:58:22+5:302024-09-06T19:00:31+5:30

Ganesh Chaturthi 2024: श्री संकटनाशनं गणेश स्तोत्र म्हणणे अत्यंत शुभफलाची प्राप्ती करून देणारे लाभदायक मानले जाते.

ganesh chaturthi 2024 recite regularly this shree sankatnashan ganpati stotra in marathi | गणेश चतुर्थी: मराठीत गणपती संकटनाशनं स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; बाप्पा इच्छापूर्ती करेल!

गणेश चतुर्थी: मराठीत गणपती संकटनाशनं स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; बाप्पा इच्छापूर्ती करेल!

Ganesh Chaturthi 2024: घरोघरी गणरायाची स्थापना होत आहे. पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर घराघरात अगदी चैतन्य, उत्साहाचे वातावरण असणार आहेत. मंडळांच्या गणपतीत गेले अनेक दिवस घेतलेल्या मेहनतीचे साकार स्वरुप पाहताना समाधानाची भावना असणार आहे. गणपतीत बाप्पाच्या पूजनासह अनेक स्तोत्रे, मंत्र, श्लोक यांचे पठण किंवा श्रवण केले जाते. गणपतीच्या गीतांचा तर या संपूर्ण गणेशोत्सवात दिवसभर मंजूळ स्वर कानी येत असतो. 

आपल्या आवडत्या बाप्पाची प्रार्थना,स्तुती करण्यासाठी आपण पूजेला स्तोत्र पठणाची जोड देतो. जसे की संस्कृतातले किंवा मराठीत भाषांतरित केलेले 'गणपती स्तोत्र' अवघ्या दोन मिनिटांत म्हणून होते. हे स्तोत्र संकटनाशन स्तोत्र म्हणूनही ओळखले जाते. आपल्याला त्याचा अर्थ माहीत असतोच असे नाही. संकट नाशन स्तोत्रात बारा गणेश नावांचा व नावानुसार स्थानांचा उल्लेख केला आहे. ही स्थाने सद्यस्थितीत कुठे आहेत, याचीही माहिती दिली आहे. त्यात उल्लेख केल्यानुसार समर्थ रामदास स्वामींनी या स्तोत्रात दडलेली बाराही गणेशस्थाने शोधून काढून बाप्पाचे दर्शन घेतले होते. तेच हे श्री संकटनाशनं गणेश स्तोत्र म्हणणे अत्यंत शुभफलाची प्राप्ती करून देणारे लाभदायक मानले जाते. 

मराठीत श्री संकटनाशनं गणेश स्तोत्र

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |

भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |

तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |

सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |

अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |

विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||

विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |

पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|

एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |

श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||


संस्कृतमधील श्री संकटनाशनं गणेश स्तोत्र

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।

भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।१ ।।

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।।

तृतीयं कृष्णपिङ्गगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२।।

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।।

सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३ ।।

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।४ ।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ।

न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५ ।।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।

पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६ ।।

जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ।

संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७ ।।

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् ।

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८ ।।

इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् ।

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥
 

Web Title: ganesh chaturthi 2024 recite regularly this shree sankatnashan ganpati stotra in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.