Ganga Dussehra 2022: गंगा दशहरा महोत्सव सुरु होण्याआधी देवघरातील गंगाजलाशी संबंधित चुका दुरुस्त करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 03:28 PM2022-06-03T15:28:02+5:302022-06-03T15:28:29+5:30

Ganga Dussehra 2022: गंगामातेच्या आशीर्वादाने आपली सर्व पापं धुतली जातात. त्यामुळे गंगाजलाशी संबंधित चुका टाळणे इष्ट ठरते. गंगा दशहरा उत्सवानिमित्त ती माहिती जाणून घेऊ. 

Ganga Dussehra 2022: Correct the mistakes related to Ganga water in the hometemple before the Ganga Dussehra festival begins! | Ganga Dussehra 2022: गंगा दशहरा महोत्सव सुरु होण्याआधी देवघरातील गंगाजलाशी संबंधित चुका दुरुस्त करा!

Ganga Dussehra 2022: गंगा दशहरा महोत्सव सुरु होण्याआधी देवघरातील गंगाजलाशी संबंधित चुका दुरुस्त करा!

Next

गंगा पृथ्वीवर अवतरली तो दिवस गंगा दशहरा म्हणून साजरा केला जातो. यंदा ९ जून रोजी गंगा दशहरा आहे. पापांचा नाश करणाऱ्या गंगा नदीला सनातन धर्मात अत्यंत महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. गंगेत स्नान करणारी व्यक्ती पावन होते अशी आपली श्रद्धा आहे. म्हणून प्रत्येक पूजा आणि शुभ कार्यात गंगाजलाचा वापर केला जातो. तसेच मृत्युमुखी पडलेल्या किंवा मृत व्यक्तीच्या तोंडात पापक्षालन व्हावे म्हणून अखेरचे गंगाजल घातले जाते. त्यामुळे बहुतेक हिंदू घरात गंगाजल ठेवले जाते.

>>गंगेचे पावित्र्य जपणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी पुढील चुका टाळा-

>>स्नान केल्याशिवाय गंगा जलाला कधीही स्पर्श करू नका. देहाची शुद्धता महत्त्वाची!

>>मांस आणि मद्य सेवन केले असेल तर गंगाजलाला स्पर्श करू नका. अन्यथा पाप लागते.

>>देव्हाऱ्यात गंगाजल ठेवताना तिथे स्वच्छता राखा. 

>>गंगाजल ठेवण्यासाठी घरातील सर्वोत्तम स्थान म्हणजे घराचा ईशान्य कोपरा. ही बाजू देवांची बाजू मानली जाते. 

>>प्लास्टिकच्या बाटलीत गंगाजल कधीही ठेवू नका. प्लॅस्टिक हे अशुद्ध असून त्यामध्ये जास्त काळ गंगाजल ठेवल्याने त्यात विषारी रसायने होतात. गंगाजल नेहमी पितळी, तांबे किंवा चांदीच्या भांड्यात ठेवणे चांगले.

>>गंगाजल कधीही अंधारात ठेवू नका. रात्रीच्या वेळीही येथे मंद प्रकाशाची व्यवस्था ठेवा.

>>घरात सोहेर किंवा सुतक असेल तर गंगाजलाला स्पर्श करू नये. बाहेरील अन्य व्यक्तीला तसेच नातेवाईकांना गंगाजल शिंपडून घरशुद्धी करण्यास सांगावे!

Web Title: Ganga Dussehra 2022: Correct the mistakes related to Ganga water in the hometemple before the Ganga Dussehra festival begins!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.