Ganga Dussehra 2024: गंगा दहशरा समाप्तीला 'या' राशींचे उजळणार भाग्य; आयुष्यात होतील सकारात्मक बदल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 03:12 PM2024-06-08T15:12:05+5:302024-06-08T15:12:49+5:30
Ganga Dussehra 2024: यंदा गंगा दशहरा समाप्तीला अर्थात १६ जून रोजी तीन दुर्मिळ योग जुळून येत आहेत, त्याचा उत्तम फायदा पुढील तीन राशींना होणार आहे
गंगा दसऱ्याला सनातन धर्मात मोठे धार्मिक महत्त्व आहे. या शुभ मुहूर्तावर गंगा देवीची उपासना करणाऱ्यांना मोक्षप्राप्ती होते, असे सांगितले जाते. तसेच त्यांच्या पूर्वजांचे कल्याण होते. हिंदू कॅलेंडरनुसार, गंगा दशहरा हा सण ज्येष्ठ महिन्यात प्रतिपदा ते दशमी या कालावधीत साजरा केला जातो. यंदा हा उत्सव ७ जून रोजी सुरु झाला असून १६ जून रोजी या उत्सवाची समाप्ती आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गंगा दशहरा समाप्तीच्या दिवशी तीन राशींचे भाग्य उजळणार आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
गंगा दशहरा शुभ योग
यंदाचा गंगा दशहरा अतिशय खास आहे, कारण पंचांगानुसार या दिवशी हस्त नक्षत्र, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवि योग तयार होत आहेत. अनेक शुभ योगायोगांमुळे हा दिवस स्वतःच खूप भाग्यवान ठरला आहे. या दिवशी गंगा मातेचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या तिथीला तिची विधीपूर्वक पूजा करा. गंगा स्तोत्र म्हणा आणि लाभ मिळवा.
या शुभयोगावर ३ राशींना या दुर्मिळ संयोगाचा जबरदस्त फायदा होईल, चला तर मग जाणून घेऊया तुमच्या राशीचे नाव त्यात समाविष्ट आहे का?
त्या तीन भाग्यवान राशी पुढीलप्रमाणे आहेत :
गंगा दशहराच्या दिवशी मेष, मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार आहे. हा दिवस त्यांच्यासाठी खूप खास असेल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून असे मानले जाते की त्यांना संपत्ती प्राप्तीचा योग्य आहे. तसेच या राशींपैकी जे लोकआर्थिक संकटात होते, त्यांनाही त्यातून दिलासा मिळेल.
यामुळे व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो आणि घरात शांती आणि आनंद राहील. या व्यतिरिक्त या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील, ज्याचा त्यांना दीर्घकाळ फायदा होईल.