Ganga Saptami 2023: घरामध्ये लक्ष्मी मातेचा कायमस्वरूपी सहवास हवा असेल तर गंगा सप्तमीला करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 04:54 PM2023-04-24T16:54:13+5:302023-04-24T16:55:17+5:30

Ganga Saptami 2023: २७ एप्रिल रोजी गंगासप्तमी आहे, त्यादिवशी दिलेले उपाय करा आणि वास्तूमध्ये भरभराट मिळवा!

Ganga Saptami 2023: Do 'This' Remedy on Ganga Saptami if you want to have the eternal presence of Goddess Lakshmi in your home! | Ganga Saptami 2023: घरामध्ये लक्ष्मी मातेचा कायमस्वरूपी सहवास हवा असेल तर गंगा सप्तमीला करा 'हे' उपाय!

Ganga Saptami 2023: घरामध्ये लक्ष्मी मातेचा कायमस्वरूपी सहवास हवा असेल तर गंगा सप्तमीला करा 'हे' उपाय!

googlenewsNext

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी गंगा सप्तमी साजरी केली जाते. यावर्षी २७ एप्रिलला गंगा सप्तमी साजरी होणार आहे. या विशेष दिवशी केलेल्या उपायांमुळे व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते.

गंगा ही सर्वसाधारण नदी नाही तर भारतीयांसाठी मातृस्थानी असलेली पवित्र नदी आहे. वैशाख सप्तमीला गंगा नदी भगवान शंकराच्या जटेतून पृथ्वीवर अवतीर्ण झाली तो दिवस गंगासप्तमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गंगेत स्नान केल्याने चौपट पुण्य मिळते आणि पापक्षालन होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. या दिवशी गंगा मातेची पूजा केली जाते. तसेच काही उपचार केले जातात, जेणेकरून ते उपाय केले असता तुम्ही गंगा मातेचा विशेष आशीर्वाद मिळवू शकता. चला तर ते उपचार जाणून घेऊया

पापांपासून मुक्त व्हा : गंगा सप्तमीच्या दिवशी गंगास्नानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे मान, कीर्ती मिळते. गंगेत स्नान शक्य नसले तर घरी स्नान करताना गंगेचे आवर्जून स्मरण करावे. नुसत्या स्मरणानेही पापक्षालन होते अशी आपल्या पूर्वजांची शिकवण आहे. 

मोक्ष प्राप्ती : गंगा सप्तमीच्या दिवशी गंगास्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने मोक्ष प्राप्त होतो. हे दान सत्पात्री असावे. म्हणजेच गरजवंताची गरज ओळखून केलेले दान असावे. 

चांगले नशीब : गंगा सप्तमीच्या दिवशी एक पात्र गंगेच्या पाण्याने भरून त्यात पाच बेलची पाने टाकून भोलेनाथाला अभिषेक करावा. संपूर्ण पाणी गंगेचे नसले तर घरात असलेले गंगाजलाचे काही थेंब पाण्यात टाकून त्या पाण्याने अभिषेक करावा. यामुळे तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल.

इच्छा पूर्ण होईल : गंगा सप्तमीच्या दिवशी गंगेची पूजा केल्यानंतर तुपाचा दिवा लावून गंगेत सोडावा. यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तसे शक्य नसेल तर सायंकाळी एक तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाशी लावून तो गंगा मातेचे स्मरण करून तिला समर्पित करावा आणि आपली इच्छा गंगामातेला बोलून दाखवावी. येत्या काही काळात त्या इच्छांची पूर्ती होण्याचा संभव असतो. 

वास्तू दोष दूर होईल : घरातील वास्तु दोष दूर करण्यासाठी या दिवशी गंगाजल शिंपडावे. गंगाजल पवित्र असल्याने ते शिंपडल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन पावित्र्य, मांगल्य निर्माण होते, त्यामुळे त्याचा वापर रोज केला तरीही चालू शकते. 

पैसे मिळवण्यासाठी : गंगा सप्तमीच्या दिवशी धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गंगेत स्नान केल्यानंतर गंगा मातेला एक श्रीफळ अर्पण करावा. गंगास्नान शक्य नसेल तर नेहेमीप्रमाणे अंघोळ झाल्यावर आपल्या दैनंदिन कामांना सुरुवात करण्याआधी एक श्रीफळ आणि काही पैसे यांचे दान गरजवंताला द्यावेत, यामुळे आर्थिक समस्या दूर होऊन धनलाभ होईल. 

घरातील स्थिर लक्ष्मीसाठी : घरात स्थिर लक्ष्मी हवी असेल तर गंगासप्तमीपासून देवघरात गंगेचे पाणी ठेवायला सुरुवात करा. आणि आपल्या नित्यपूजेत गंगाजलाचा समावेश करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून लक्ष्मी घरात स्थिरावते.

Web Title: Ganga Saptami 2023: Do 'This' Remedy on Ganga Saptami if you want to have the eternal presence of Goddess Lakshmi in your home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.