Gauri Puja 2023: आज गौरीपूजनाच्या वेळी आवर्जून म्हणावे असे महागौरी स्तोत्र; मिळेल सुख, शांती आणि सौभाग्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 12:08 PM2023-09-22T12:08:22+5:302023-09-22T12:09:24+5:30

Gauri Puja 2023: २१ सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन झाले, आज पूजन व उद्या २३ सप्टेंबर रोजी विसर्जन केले जाईल; त्यावेळी हे प्रासादिक स्तोत्र जरूर म्हणा!

Gauri Puja 2023: Mahagauri Stotra to be recited today during Gauri Puja; You may get Happiness, peace and good luck! | Gauri Puja 2023: आज गौरीपूजनाच्या वेळी आवर्जून म्हणावे असे महागौरी स्तोत्र; मिळेल सुख, शांती आणि सौभाग्य!

Gauri Puja 2023: आज गौरीपूजनाच्या वेळी आवर्जून म्हणावे असे महागौरी स्तोत्र; मिळेल सुख, शांती आणि सौभाग्य!

googlenewsNext

गणेशोत्सवात गणपती पाठोपाठ गौरी येते. तिच्या गौर वर्णामुळे आणि तिच्याठायी असलेल्या शक्तीमुळे तिला महागौरी म्हटले जाते. यंदा गौरी आगमन : २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३४ च्या आधी, गौरी पूजन : २२ सप्टेंबर सकाळी ९ च्या आधी आणि नैवेद्य दुपारी १२.३० च्या आधी आणि गौरी विसर्जन : २३ सप्टेंबर दुपारी २. ५५ मिनिटांपर्यंत करायचे आहे.

गौरी पूजनाच्या पद्धती आणि नैवेद्य :

गौरी आवाहन करण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. काही जण चांदीच्या, पितळेच्या व मातीच्या मुखवट्यावर, काही जणी सुघटावर, काही जणी मूर्तीवर तर काही जणी वाहत्या पाण्याशेजारील खड्यांवर गौरीचे आवाहन करतात. त्यानंतर तिची यथाविधी पूजा करतात. हळदकुंकू, आघाडा, दूर्वा, फुले, कापसाची वस्त्रे अर्पण करतात. पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी, दुसऱ्या दिवशी पुरण, खीर, तर तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवले, दहीभात असा नैवेद्य करतात. इतरही स्वयंपाक असतोच.

हात जोडून या मंत्राचा जप करा :

'सिद्धगन्धर्वयक्षा द्यैरसुरै रमरैरपि। सेव्या माना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी॥'

या मंत्राचे पठण केल्यानंतर, महागौरी देवीच्या विशेष मंत्रांचा जप करा आणि आईचे ध्यान करा आणि तिला सुख आणि सौभाग्याची प्रार्थना करा.

महागौरीचा मंत्र :

श्वेते वृषे समरूढा श्वेताम्बराधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।।

या देवी सर्वभू‍तेषु मां गौरी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

महागौरी स्तोत्र :

सर्वसंकट हंत्री त्वंहि धन ऐश्वर्य प्रदायनीम्।
ज्ञानदा चतुर्वेदमयी महागौरी प्रणमाभ्यहम्॥
सुख शान्तिदात्री धन धान्य प्रदीयनीम्।
डमरूवाद्य प्रिया अद्या महागौरी प्रणमाभ्यहम्॥
त्रैलोक्यमंगल त्वंहि तापत्रय हारिणीम्।
वददं चैतन्यमयी महागौरी प्रणमाम्यहम्॥

माता महागौरी ध्यान :

वन्दे वांछित कामार्थे चन्द्रार्घकृत शेखराम्।
सिंहरूढ़ा चतुर्भुजा महागौरी यशस्वनीम्॥

पूर्णन्दु निभां गौरी सोमचक्रस्थितां अष्टमं महागौरी त्रिनेत्राम्।
वराभीतिकरां त्रिशूल डमरूधरां महागौरी भजेम्॥
पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालंकार भूषिताम्।
मंजीर, हार, केयूर किंकिणी रत्नकुण्डल मण्डिताम्॥
प्रफुल्ल वंदना पल्ल्वाधरां कातं कपोलां त्रैलोक्य मोहनम्।
कमनीया लावण्यां मृणांल चंदनगंधलिप्ताम्॥

माता महागौरी कवच :

ओंकारः पातु शीर्षो मां, हीं बीजं मां, हृदयो।
क्लीं बीजं सदापातु नभो गृहो च पादयो॥

ललाटं कर्णो हुं बीजं पातु महागौरी मां नेत्रं घ्राणो।
कपोत चिबुको फट् पातु स्वाहा मा सर्ववदनो॥
ॐ देवी महागौर्यै नमः॥

अशाप्रकारे महागौरीची पूजा केल्याने अशक्य कामे सुद्धा शक्य होतात, सर्व पापांचा नाश होतो, सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

Web Title: Gauri Puja 2023: Mahagauri Stotra to be recited today during Gauri Puja; You may get Happiness, peace and good luck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.