Gauri Pujan 2022: सुख व सौभाग्यप्राप्तीसाठी गौरीपूजनाच्या वेळी म्हणा महागौरी स्तोत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 05:38 PM2022-09-03T17:38:31+5:302022-09-03T17:39:03+5:30
Gauri Pujan 2022: स्तोत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य असते, ते नियमीत म्हटले पाहिजेच, शिवाय उत्सव प्रसंगी त्याचे उच्चारण होणे अधिक फलदायी ठरते!
गौरी आणि गणपती आपल्या घरी पाहुणचार घेण्यासाठी आले आहेत. त्यांची यथासांग पूजा आपण करतच आहोत. याबरोबरीने केलेला मंत्रोच्चार सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल आणि मंत्रोच्चाराने होणारी वातावरण निर्मिती सुख-सौभाग्य कारक ठरेल. यासाठी गौरी पूजेच्या वेळी पुढे दिलेले महागौरीचे स्तोत्र आवर्जून म्हणा. जर हे स्तोत्र पाठ नसेल तर इंटरनेटवर हे स्तोत्र लावून डोळ्यासमोर या स्तोत्राचे शब्द ठेवून मंत्रोच्चाराचा प्रामाणिक प्रयत्न करा. अवश्य लाभ होईल!
महागौरीचा मंत्र :
श्वेते वृषे समरूढा श्वेताम्बराधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।।
या देवी सर्वभूतेषु मां गौरी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
महागौरी स्तोत्र :
सर्वसंकट हंत्री त्वंहि धन ऐश्वर्य प्रदायनीम्।
ज्ञानदा चतुर्वेदमयी महागौरी प्रणमाभ्यहम्॥
सुख शान्तिदात्री धन धान्य प्रदीयनीम्।
डमरूवाद्य प्रिया अद्या महागौरी प्रणमाभ्यहम्॥
त्रैलोक्यमंगल त्वंहि तापत्रय हारिणीम्।
वददं चैतन्यमयी महागौरी प्रणमाम्यहम्॥
माता महागौरी ध्यान :
वन्दे वांछित कामार्थे चन्द्रार्घकृत शेखराम्।
सिंहरूढ़ा चतुर्भुजा महागौरी यशस्वनीम्॥
पूर्णन्दु निभां गौरी सोमचक्रस्थितां अष्टमं महागौरी त्रिनेत्राम्।
वराभीतिकरां त्रिशूल डमरूधरां महागौरी भजेम्॥
पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालंकार भूषिताम्।
मंजीर, हार, केयूर किंकिणी रत्नकुण्डल मण्डिताम्॥
प्रफुल्ल वंदना पल्ल्वाधरां कातं कपोलां त्रैलोक्य मोहनम्।
कमनीया लावण्यां मृणांल चंदनगंधलिप्ताम्॥
माता महागौरी कवच :
ओंकारः पातु शीर्षो मां, हीं बीजं मां, हृदयो।
क्लीं बीजं सदापातु नभो गृहो च पादयो॥
ललाटं कर्णो हुं बीजं पातु महागौरी मां नेत्रं घ्राणो।
कपोत चिबुको फट् पातु स्वाहा मा सर्ववदनो॥
ॐ देवी महागौर्यै नमः॥
अशाप्रकारे महागौरीची पूजा केल्याने अशक्य कामे सुद्धा शक्य होतात, सर्व पापांचा नाश होतो, सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते.