Gauri Visarjan 2024: सौभाग्यप्राप्तीसाठी गौरी विसर्जनाआधी आवर्जून म्हणा 'हे' प्रभावी स्तोत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 11:55 AM2024-09-12T11:55:21+5:302024-09-12T12:00:46+5:30
Gauri Visarjan 2024: आज गौरी विसर्जन, माहेरी पाहुणचार घ्यायला आलेली गौराई जाताना भरपूर आशीर्वाद देऊन जावी असे वाटत असेल तर दिलेले स्तोत्र आवर्जून म्हणा!
गौरी-गणपतीची लगबग म्हणता पाहता आज १२ सप्टेंबर रोजी निरोप देण्याचीही वेळ जवळ आली. गौराईचे माहेरपण एखाद्या माहेरवाशिणीसारखेच हौसेने केले जाते. विविध पक्वान्न, फराळ, मिठाई, फळं, सुकामेवा नैवेद्यासाठी ठेवला जातो. शिवाय घावन-घाटले, पुरणा-वरणाचाही नैवेद्य दाखवला जातो.
गौरी विसर्जन (Gauri Visarjan 2024) पूजा गौरी पूजनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी सुरू होते. यंदा गौरी विसर्जन मुहूर्त (Gauri Visarjan Muhurat 2024) १२ सप्टेंबर रोजी दुपारी १. ३१ ते रात्री ९.५१ मिनिटांपर्यंत आहे. त्याआधी पुढील स्तोत्र आवर्जून म्हणा.
हात जोडून या मंत्राचा जप करा-
'सिद्धगन्धर्वयक्षा द्यैरसुरै रमरैरपि। सेव्या माना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी॥'
या मंत्राचे पठण केल्यानंतर, महागौरी देवीच्या विशेष मंत्रांचा जप करा आणि आईचे ध्यान करा आणि तिला सुख आणि सौभाग्याची प्रार्थना करा.
महागौरीचा मंत्र :
श्वेते वृषे समरूढा श्वेताम्बराधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।।
या देवी सर्वभूतेषु मां गौरी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
महागौरी स्तोत्र :
सर्वसंकट हंत्री त्वंहि धन ऐश्वर्य प्रदायनीम्।
ज्ञानदा चतुर्वेदमयी महागौरी प्रणमाभ्यहम्॥
सुख शान्तिदात्री धन धान्य प्रदीयनीम्।
डमरूवाद्य प्रिया अद्या महागौरी प्रणमाभ्यहम्॥
त्रैलोक्यमंगल त्वंहि तापत्रय हारिणीम्।
वददं चैतन्यमयी महागौरी प्रणमाम्यहम्॥
माता महागौरी ध्यान :
वन्दे वांछित कामार्थे चन्द्रार्घकृत शेखराम्।
सिंहरूढ़ा चतुर्भुजा महागौरी यशस्वनीम्॥
पूर्णन्दु निभां गौरी सोमचक्रस्थितां अष्टमं महागौरी त्रिनेत्राम्।
वराभीतिकरां त्रिशूल डमरूधरां महागौरी भजेम्॥
पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालंकार भूषिताम्।
मंजीर, हार, केयूर किंकिणी रत्नकुण्डल मण्डिताम्॥
प्रफुल्ल वंदना पल्ल्वाधरां कातं कपोलां त्रैलोक्य मोहनम्।
कमनीया लावण्यां मृणांल चंदनगंधलिप्ताम्॥
माता महागौरी कवच :
ओंकारः पातु शीर्षो मां, हीं बीजं मां, हृदयो।
क्लीं बीजं सदापातु नभो गृहो च पादयो॥
ललाटं कर्णो हुं बीजं पातु महागौरी मां नेत्रं घ्राणो।
कपोत चिबुको फट् पातु स्वाहा मा सर्ववदनो॥
ॐ देवी महागौर्यै नमः॥
अशाप्रकारे महागौरीची पूजा केल्याने अशक्य कामे सुद्धा शक्य होतात, सर्व पापांचा नाश होतो, सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
Gauri Visarjan 2024: गौरी विसर्जनाच्या वेळी प्रामुख्याने लक्षात ठेवा 'या' गोष्टी; टाळा चुका!