तुम्ही रोज गायत्री मंत्र म्हणता? ‘हे’ नियम पाळणे अत्यावश्यक; चुका टाळा, अन्यथा नुकसान अटळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 03:39 PM2022-06-19T15:39:11+5:302022-06-19T15:40:38+5:30

Gayatri Mantra Rules in Marathi: हिंदू धर्मांत सर्वाधिक महत्त्व असलेल्या गायत्री मंत्राच्या नित्य पठणाचे अनेक फायदे सांगितले जातात. मात्र, काही नियम पाळणे आवश्यक आहे. जाणून घ्या...

gayatri mantra rules must follow while chanting and know about significance and auspicious benefits | तुम्ही रोज गायत्री मंत्र म्हणता? ‘हे’ नियम पाळणे अत्यावश्यक; चुका टाळा, अन्यथा नुकसान अटळ!

तुम्ही रोज गायत्री मंत्र म्हणता? ‘हे’ नियम पाळणे अत्यावश्यक; चुका टाळा, अन्यथा नुकसान अटळ!

googlenewsNext

भारतात प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांना अनन्य साधारण महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. देशात विविध देवतांची शेकडो मंदिरे, प्रार्थनास्थळे असल्याचे दिसते. यातच कोट्यवधी भाविक दररोज अगदी न चुकता आपले आराध्य, कुलदेवता यांचे नामस्मरण, जप, पूजन करत असतात. तसेच प्राचीन ग्रंथात आपल्याला देवतांचे नानाविध मंत्र, उपासना पद्धती, श्लोक, स्तोत्रे आढळून येतात. हिंदू धर्मात गायत्री मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र मानला जातो. गायत्री मंत्राचे अनेकविध फायदे सांगितले जातात. गायत्री मंत्राचा जप अतिशय शुभ तसेच उपयुक्त मानला जातो. मात्र, या गायत्री मंत्राचे काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले जाते. (Gayatri Mantra Rules in Marathi)

गायत्री देवी ही त्रिदेवाची आराध्य असल्याचे मानले जाते. हिंदू धर्मात गायत्री मंत्राला विशेष महत्त्व आहे. ब्रह्मऋषी विश्वामित्रांनी गायत्री मंत्राचा प्रसार केला.त्यांनी गायत्री मंत्राचा जप करण्याचे फायदे सांगितले, अशी मान्यता आहे. गायत्री मंत्राचा सर्वात जुना उल्लेख ऋग्वेदात आढळतो. हिंदू धर्मात गायत्री मंत्राला विशेष स्थान देण्यात आले आहे. सर्व विधींमध्ये त्याचा जप केला जातो. गायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती, ऑफिसमध्ये येणाऱ्या अडचणी इत्यादी दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. गायत्री मंत्राचे अनेक फायदे आहेत. मात्र, यासंबंधी नियमांची काळजी घेतली नाही, तर त्याचे विपरीत परिणामही होऊ शकतात. (Gayatri Mantra Significance And Auspicious Benefits)

गायत्री मंत्र पठणाचे शुभफल

- गायत्री मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि जीवनात आनंद मिळतो. हा सर्वात फायदेशीर मंत्र मानला जातो.

- गायत्री मंत्राच्या नुसत्या उच्चाराने वातावरण शुद्ध होते.या मंत्राने मनाची एकाग्रता वाढते. या मंत्राने मन मजबूत होते.

- गायत्री मंत्राचा जप केल्याने शरीराच्या अवयवांवरही सकारात्मक प्रभाव पडतो आणि त्यामध्ये ऊर्जा प्रवाहित होते.

- गायत्री मंत्राने शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. हृदयाला फायदा होतो.

- गायत्री मंत्राचा नियमित जप केल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते.

गायत्री मंत्राचे महत्त्वाचे नियम

- धार्मिक ग्रंथांनुसार, मंत्राचा उच्चार स्पष्टपणे केला जातो. जप करताना चुकीचा उच्चार केल्यास व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो.

- सूर्योदयापूर्वी गायत्री मंत्राचा जप करावा.या मंत्राचा जप दुपारीही करता येतो.

- गायत्री मंत्राचा जप सायंकाळी, सूर्यास्तापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर करावा.

- गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी स्नान वगैरे आटोपल्यानंतर स्वच्छ व सुती वस्त्रे परिधान करून कोणतेही आसन घालावे.

- गायत्री मंत्राचा जप बसून करावा. नामजपासाठी तुळशी किंवा चंदनाची माळ वापरावी.

- गायत्री मंत्राचा जप १०८ वेळा करावा. असे केल्याने चांगले परिणाम मिळतात. गायत्री मंत्राचा जप करताना रुद्राक्षाची माळ शुभ मानली जाते. 

- गायत्री मंत्राचा जप करण्यापूर्वी खाण्यापिण्याची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. 

- गायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला रोगांपासून मुक्ती मिळते. घरात सुख-समृद्धी नांदते. सकारात्मक ऊर्जा राहते. 
 

Web Title: gayatri mantra rules must follow while chanting and know about significance and auspicious benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.