Gemology: 'पुष्कराज' अंगठी कोणी वापरावी आणि कोणी नाही? जाणून घ्या आणि मगच वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 02:32 PM2023-06-27T14:32:48+5:302023-06-27T14:33:03+5:30

Astrology Tips: ग्रह, नक्षत्रांवर तोडगे म्हणून अनेक जण नवग्रहांशी संबंधित असलेले खडे अंगठीत घालतात, पण सगळ्यांनाच फायदा होतो असे नाही, का? ते वाचा!

Gemology: Who Should Wear 'Topaz' Ring And Who Should Not? Know and then use! | Gemology: 'पुष्कराज' अंगठी कोणी वापरावी आणि कोणी नाही? जाणून घ्या आणि मगच वापरा!

Gemology: 'पुष्कराज' अंगठी कोणी वापरावी आणि कोणी नाही? जाणून घ्या आणि मगच वापरा!

googlenewsNext

>> ज्योतिषी सोनाली लिखितकर

 पुष्कराज रत्न सर्वांनी घातले तर चालेल का ?अशी  विचारणा मला काही जणांनी केली होती आणि त्यावरचे माझे काही अनुभव आपल्यासमोर मांडत  आहे.  मे २००८ ची गोष्ट .एक तरुण , वय वर्षे ३२ .माझ्या कडे आला होता. त्यांचा प्रश्न होता ,मी गेले ७ वर्ष लग्न होण्याकरता प्रयत्न करतोय पण जमत नाहीय. आमच्या समाजात लवकर लग्ने केली जातात . पण माझे दर वेळी काही ना काही होऊन लग्न मोडते .कधी मुलगी पसंत पडत नाही .तर कधी मी  मुलीला पसंत पडत नाही. दोघे पसंत झालो तर घरच्यांना स्थळ पसंत पडत नाही .एकदा तर बस्ता बांधायला गेलो आणि तेथे भांडणे होऊन लग्न  मोडले .वास्तविक आम्ही दोघे लग्न करायला तयार होतो, पण घरच्या लोकांसमोर  काय करणार? शेवटी अजूनही मी अविवाहित आहे .आता माझी पत्रिका पाहून सांगा काय प्रोब्लेम आहे? मी पत्रिका पाहीली.

आता थोडे विवाह योगाविषयी सांगावे लागेल. कुंडलीतील १२ स्थानांपैकी १ आणि ६ ही स्थाने विवाहास प्रखर विरोध करतात .आता त्याची कुंडली नीट अभ्यासली. पण मला थोडासा त्रास वगळता कोणताही मोठे कारण दिसेना की ज्यामुळे लग्नच होणार नाही. मग सहज लक्ष गेले  की पत्रिकेत १ आणि ६ या स्थानाचा एकमेव कार्येश ग्रह गुरु आहे .तेवढ्यात तो म्हणाला अहो ताई, हा बघा पुष्कराज चांगला ७ कॅरटचा आहे. आमच्या गावातल्या गुरुजींनी सांगितला होता घालायला. चांगला असतो ना तो लग्नाकरता म्हणून! मी तर हादरलेच .अरे बापरे, हे कारण आहे की काय याच्या लग्न ना होण्याचे? 

मग त्याला विचारले कीती वर्षापासून घातला आहे ? तो म्हणला ५ वर्षे झाली. आता तुम्ही अजून काही खडा किंवा पूजा असेल तर सांगा मी करतो. कितीही खर्च होऊ द्या. मी आणि माझे आई वडील फार वैतागलो आहे .मी पुन्हा कुंडलीवर नजर टाकली. त्याच्या कुंडलीत बुध ग्रह विवाहाच्या दृष्टीने उत्तम वाटत होता आणि त्याची दशा म्हणजेच त्यांचा काल सुरु होणार होता नोव्हेम्बरमध्ये आणि आता तर मे महिना  होता. पण तरीही खूप काही लांब नव्हता. म्हणुन त्याला म्हणाले, "हे बघ बुध ग्रह म्हणजेच पाचू हे बुधाचे रत्न तुला फायदेशीर आहे ,पण त्याचा काल अगदी ५,६ महिन्यातच सुरु होणार असल्याने तू पाचू घातला नाहीस तरी चालेल. आपोआपच तेव्हा लग्न होईल. पण महत्वाचे म्हणजे हा पुष्कराज अगदी लगेच काढ ". तर तो म्हणाला ,"पण ताई तो तर मला लग्नाकरिताच सांगितला होता". मग मी त्याला गुरूच्या रत्नाचे त्याच्या कुंडलीत काय परिणाम आहेत ते सांगितले . आणि म्हणले ,जसे  सर्दीताप  बरा  होण्याकरिता आपण औषध घेतो पण त्याबरोबरच थंड पदार्थ ,दही इत्यादी न खाणे हे पथ्य पाळावे लागते, तसेच तुझे झाले आहे तुझा विवाह योग असून सुद्धा तू त्याला अपथ्यकर असा पुष्कराज त्यातून ७ कॅरटचा  घातलास. म्हणूनच विवाह योग असून लग्न ठरत नव्हते आणि अजून एक सोपा उपाय सांगते तो कर. असे सांगून त्याला एक उपाय सांगितला. हा उपाय तुला दर बुधवारी ७ आठवडे करावा लागेल हे पण सांगितले.

"ठीक  आहे. काढतो ताई खडा .असे म्हणुन त्याने पुष्कराज  काढला.  ताई आता तुम्ही सांगितलेले बाकी  उपाय पण करून पाहतो" असे म्हणुन तो गेला. बरोबर ३ आठवड्या नंतरच्या बुधवारी रात्री ९ वाजता त्यांचा फोन आला. अतिशय आनंदाने त्याने सांगितले.२ दिवसापूर्वी त्याने एक मुलगी पाहीली आणि दोन्ही कड्च्याना पसंत पडून लग्न ठरले आहे. मग ३,४ दिवसात पुन्हा मुहूर्त काढून द्या जुलै महिन्यातला असे म्हणुन आला. पण मी म्हणाले तुझा योग तर नोव्हेंबर मध्ये आहे .पण ताई आता घरच्यांनी या सिझनच्या शेवटचा मुहूर्त जुलै १४ आहे. त्याच्या अगोदरच लग्न करायचे ठरवले आहे .मग मी नाईलाजास्तव मुहूर्त काढून दिला .मग पुन्हा महिन्याभराने त्यांचा फोन आला .मग मी चेष्टेने  म्हणले काय रे लग्नाला बोलावले नाही का? तर म्हणाला आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो लग्नाच्या हॉल करिता पण कुठेच मिळेना .सर्व चांगले हॉल बुक झाले होते .शेवटी हॉलवालाच म्हणला ,"अहो तुम्हाला नोव्हेम्बर मध्ये हवा असेल तर भरपूर तारखा आहेत शिल्लक आणि मध्ये तर चातुर्मास आहे त्यात करत नाहीत ना .म्हणुन आम्ही शेवटी आता नोव्हेम्बर मध्येच ठरवलंय .आता तुम्ही नोव्हेम्बरचा मुहूर्त काढून द्या.'' मी मनातच हसले. माझ्या गुरुवर्यांना आणि कृष्णमुर्ती  पद्धत ज्यांनी तयार केली त्या कृष्ण मूर्तींना  मनोमन वंदन केले. आता त्याचे लग्न होऊन त्याला एक छान मुलगी पण झालीय ......

संपर्क: 9890447025

 

Web Title: Gemology: Who Should Wear 'Topaz' Ring And Who Should Not? Know and then use!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.