सद्विचारांच्या बेटावरची दृक-श्राव्य भक्ती..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 04:47 PM2020-10-09T16:47:40+5:302020-10-09T16:52:14+5:30

एकमेकांचे दोष दाखवतच जो तो आपले थोरपण संपवून टाकतो..!

Good spot of good thoughts | सद्विचारांच्या बेटावरची दृक-श्राव्य भक्ती..!

सद्विचारांच्या बेटावरची दृक-श्राव्य भक्ती..!

Next

पुणे : आपला मानवी देह हा नेहमी दृक-श्राव्य माध्यमांत गुंतलेला असतो. त्यातुन एकाचवेळी चांगले-वाईट असे विचारांचे दोन मार्ग कार्यरत असतात. परंतु, आपण चांगले कमी ऐकतो, पाहतो आणि वाईट गोष्टींचे जास्त आकर्षण घेऊन जगतो. मुळात अवती भवतीचे निसर्ग चित्रच बिघडत चालले आहे. जगाची गाडीच रुळावरून घसरत चालली आहे. त्यामुळे सध्या तुम्ही कुठलेही वर्तमान पत्र वाचा आणि चॅनेल बघा तिथे तुम्हाला सर्वाधिक हिंसा, क्रोध, अत्याचार, भीती, नकारात्मक विचारांच्या विषयांचेच प्राबल्य पाहायला मिळते.

एकमेकांच्या उणिवा काढणे. एकमेकांचे दोष पाहणे. हे जर तुम्ही सतत ऐकायला लागलात तर तुमच्या मनात विचार चांगले विचार थोडेच येणार आहेत का ? सारखे नको ते विचार येणार व मनाला स्थिरता कधी येणारच नाही.

    आपल्या मनात वाईट विचारांची प्राबल्य कमी होऊन जर चांगल्या विचारांची निर्मिती असे वाटत असेल तर त्यासाठी गोष्टी नक्कीच नव्याने स्वीकाराव्या लागतील आणि काही बदलाव्या देखील लागणार आहे. त्याची सुरुवात ही नेहमी चांगलय श्रवणाने केली पाहिजे. जितक्या जास्त प्रमाणात चांगले विचार आपल्या कानावर पडत राहतील तितके आपले वाईट सवयीतून बाहेर पडण्यास मदत होईल. मनातले वाईट विचार हळूहळू कमी होत जाईल. आनंद आणि सकारात्मकतेच्या कक्षेत प्रवेश करता येईल. कानावर नेहमी चांगलेच कसे पडेल याची व्यवस्था आपण केली पाहिजे. ही व्यवस्था आपोआप होत नाही. आपल्या कानात नेहमी वाईट गोष्टीच पडत असतात. कानात चांगले पडणे कठीण म्हणून तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत बसा. चांगली माणसे नेहमी चांगले बोलत असतात व त्यामुळे आपल्या कानात नेहमी चांगले चांगले पडते. एकदा तुमच्या चांगल्या गोष्टी तुमच्या कानात पडत राहिल्या की  मनात चांगले विचार येऊ लागतात. आपण जे ऐकतो ना तिथून स्मरणाला सुरुवात होते. तुम्ही काहीही ऐका, काहीही काहीही वाचा. काहीही बोला. त्याप्रमाणे आपले स्मरण होते. पाहताना सावध,  बोलताना सावध,  विचार करताना सावध, स्मरण करताना म्हणजे सावध, असा सर्वच ठिकाणी सावधपणा असायला हवा. मूळ आहे तिथे जर सावधपणा ठेवला तर बाकीचे काळजी करण्याचे कारण नाही. मूळ स्मरण म्हणजे देव. स्मरण देवाचे करावे असे म्हटलेले आहे.  

    जे जे काही चांगले, आश्वासक दिव्य जगात आहे, ते सगळे देव स्वरूपाचे आहे. आपण सगळे माणसा माणसातले दोष पाहत, ऐकवतच आपले मोठेपण संपवून टाकतो.

Web Title: Good spot of good thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.