Gudi Padwa 2021: चैत्रांगण! ६४ शुभचिन्हे असलेले भारतीय सांस्कृतीच्या समृद्धतेचे प्रतीक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 07:54 PM2021-04-09T19:54:31+5:302021-04-09T19:59:22+5:30

रांगोळीतील खास महाराष्ट्रीय प्रकार म्हणजे चैत्रांगण. महाराष्ट्रात या रांगोळीला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया... (Gudi Padwa 2021 Chaitrangan Rangoli)

gudi padwa 2021 know about symbol of indian cultural prosperity chaitrangan rangoli and its significance | Gudi Padwa 2021: चैत्रांगण! ६४ शुभचिन्हे असलेले भारतीय सांस्कृतीच्या समृद्धतेचे प्रतीक 

Gudi Padwa 2021: चैत्रांगण! ६४ शुभचिन्हे असलेले भारतीय सांस्कृतीच्या समृद्धतेचे प्रतीक 

googlenewsNext

अवघ्या काही दिवसांनी मराठी नवीन वर्षाचा आरंभ होणार आहे. यंदाचे मराठी वर्षाचे शालिवाहन शके १९४३ असून, प्लवसंवत्सरारंभ होणार आहे. देशभरात गुढीपाडवा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. केवळ महाराष्ट्रात नाही, तर विविध राज्यांमध्ये गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृतीत अनेक समृद्धी गोष्टींचा अगदी भरणा आहे. रांगोळी हा त्यातीलच एक प्रकार. रांगोळी मांगल्याचे प्रतिक मानले जाते. गावाकडे किंवा शहरातही अगदी दररोज घराबाहेर रांगोळी काढली जाते. रांगोळीतील खास महाराष्ट्रीय प्रकार म्हणजे चैत्रांगण. महाराष्ट्रात या रांगोळीला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया... (Gudi Padwa 2021 Chaitrangan Rangoli)

Chaitra Navratri 2021 Date: कधीपासून होतोय चैत्र नवरात्रारंभ? 'या' वाहनावरून होणार देवीचे आगमन

चैत्र महिना म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. मात्र, गुढीपाडवा हा विविध कारणांसाठी साजरा केला जातो. गुढीपाडव्याला घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात. चैत्र नवरात्र साजरे करताना माहेरवाशीण चैत्रागौरीचे आवाहन करून तिच्या स्वागतासाठीही रांगोळ्या काढल्या जातात. निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चैत्रांगण काढले जाते. चैत्रांगणात ६४ चिन्हे काढली जात असत. मात्र, आता कालानुरूप त्यात बदल होत गेले आणि सध्या  या रांगोळीत ५१ शुभचिन्हे काढली जातात. या चिन्हांमागे खास कारणे आहेत. (symbol of indian cultural prosperity chaitrangan rangoli)

Gudi Padwa 2021 : गोड वर्षाची कडू सुरुवात कडुलिंबाने का करतात, याचे धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व!

घरासमोरील अंगण स्वच्छ केले जाते. गोरूच्या साहाय्याने एक चौकोन तयार केला जातो आणि त्यावर चैत्रांगण काढले जाते. रांगोळीच्या सर्वात वरच्या बाजूला आंब्याचे तोरण काढले जाते. यानंतर त्याखाली देवघर काढले जाते. या देवघरात काढण्यात आलेली दोन प्रतिके शिव-पार्वती किंवा लक्ष्मी-नारायण वा चैत्रागौरी किंवा अनुराधा व स्वाती ही दोन सृजनाची नक्षत्रे असल्याचे मानले जाते. गणपती आणि सरस्वती साकारली जाते. (Chaitrangan Rangoli)

Gudi Padwa 2021 : गुढी उभारण्यामागे वसू नामक राजाची अशी आहे पौराणिक कथा!

भारतीय संस्कृतीत अनेक समृद्धीची प्रतीके सांगितली आहेत. हत्ती, घोडा, नागयुगुल, गरुड अशी समृद्धीची प्रतिके चिन्हांच्या स्वरुपात काढली जातात. याशिवाय कासव, बासरी, स्वस्तिक, त्रिशूळ, धनुष्यबाण, तुळशी वृदांवन, मोरपीस, कमळ, कलश, आंबा, केळी, सनई चौघडा, डमरू यांची प्रतिकात्मक चिन्हे काढली जातात. अक्षय मानले जाणारे सूर्य आणि चंद्र, यशाचे प्रतीक असलेला ध्वज,नववर्षाची सुरुवात म्हणून गुढी, शंख, पद्म, गदा, चक्र, गोपद्म, ओम, सौभाग्य लेणी म्हणजेच हळदी कुंकवाचा करंडा, फणी, पणती, सवाष्णीची ओटी म्हणजे खण-नारळ, रुद्राक्ष, सृजनाचे प्रतीक म्हणून पाळणा, कामधेनूसह वासरू, ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून अंबारी अशी विविध चिन्हे काढली जातात. चैत्रांगणातून समृद्ध भारतीय संस्कृती प्रतिकात्मकरित्या दाखवली जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

Gudi Padwa 2021 : गुढी पाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन का केले पाहिजे? 

Web Title: gudi padwa 2021 know about symbol of indian cultural prosperity chaitrangan rangoli and its significance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.