Gudi Padwa 2023: महाराष्ट्रात गुढीपाडव्याला नववर्षाचे स्वागत होते तसे इतर राज्यात नववर्षाची काय परंपरा आहे ते जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 10:03 AM2023-03-23T10:03:00+5:302023-03-23T10:05:02+5:30

Gudi Padwa 2023: गुढीपाडवा जसा महाराष्ट्रात साजरा केला जातो, तसा इतर राज्यातही साजरा होतो, त्या उत्सवाचे स्वरूप जाणून घ्या!

Gudi Padwa 2023: As Gudi Padwa welcomes the new year in Maharashtra, let's know what is the tradition of the new year in other states! | Gudi Padwa 2023: महाराष्ट्रात गुढीपाडव्याला नववर्षाचे स्वागत होते तसे इतर राज्यात नववर्षाची काय परंपरा आहे ते जाणून घेऊ!

Gudi Padwa 2023: महाराष्ट्रात गुढीपाडव्याला नववर्षाचे स्वागत होते तसे इतर राज्यात नववर्षाची काय परंपरा आहे ते जाणून घेऊ!

googlenewsNext

यंदा २२ मार्च रोजी राज्यातच काय तर देशात, परदेशातही गुढीपाडवा जल्लोषात साजरा झाला. या सणाचे केवळ मराठी मनाला कौतुक असते असे नाही, तर प्रथा-परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी सणाचा उत्साह सर्वत्र सारखाच दिसून येतो. सविस्तर जाणून घ्या. 

भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया देशभरातील राज्यांमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या नववर्षारंभांविषयी...

भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार, वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. तसेच चैत्र प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रास सुरुवात होते. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य राज्यांतही गुढीपाडवा साजरा केला जाते. किंबहुना इतर राज्यातही याच दिवसापासून नववर्षारंभ होतो. चाल तर मग जाणून घेऊया देशभरातील राज्यांमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या नववर्षारंभांविषयी...

भारतात सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय ग्रेगोरियन कॅलेंडर वापरले जाते. याशिवाय भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका, भारतीय राष्ट्रीय पंचांग नावाचे एक भारतातच वापरायचे सरकारी कॅलेंडर आहे. या वर्षाचा अनुक्रमांक व महिन्यांची नावे शक संवत्सराप्रमाणेच असतात. २२ मार्च १९५७ रोजी भारत सरकारने भारतीय राष्ट्रीय पंचांग वापरण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात जनतेची साथ न मिळाल्याने हे कॅलेंडर आता सरकारी पत्रांवर किंवा सरकारी राजपत्रांवर ग्रेगोरियन तिथींच्या जोडीने लिहिण्यापलीकडे वापरले जात नाही. आकाशवाणीवर या तारखांची उद्घोषणा केली जाते.

महाराष्ट्रासह गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड आणि तेलंगण या राज्यांमध्ये शक संवत्सर आणि चांद्र पंचांग वापरले जाते. चैत्रापासून म्हणजेच गुढीपाडव्यादिनी यादेखील राज्यांमधील नववर्षाचा आरंभ होतो.

गुजराथी नववर्ष दिवाळी पाडव्यापासून म्हणजे शक संवत्सराच्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. विक्रम संवत्सराप्रमाणे याची कालगणना केली जाते. मात्र, यातील महिन्यांची नावे शक संवत्सराप्रमाणेच असतात.

आसाम, केरळ, तामिळनाडू, पंजाब या राज्यांचा नववर्षारंभ अनुक्रमे रोंगाली बिहू, विशु, तमिळ, पुतंडू आणि वैशाखी या नावांनी साजरा केला जातो. एप्रिल महिन्याच्या मध्यावर या राज्यात नववर्ष साजरे केले जाते. केरळमध्ये चिंगम (कोलम वर्ष) नावाचे एक मल्याळी पंचांगही वापराले जाते. या पंचांगाप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर नववर्षाला सुरुवात होते.

बंगालमध्ये वैशाख शुद्ध प्रतिपदेला नववर्ष साजरे केले जाते. पारसी वर्षारंभाच्या दिवसाला नवरोज म्हणतात. भारतातील पारसी समाज हा दिवस ऑगस्ट महिन्यात साजरा करतात. पारशी पंचांग सूर्याधारित आहे. पारसी समाजात फसली, कदमी व शहेनशाही अशी तीन कॅलेंडरे प्रचलित आहेत. फसली पद्धतीप्रमाणे ३० दिवसांच्या १२ महिन्यांचे वर्ष होते. शेवटच्या महिन्यानंतर ५ किंवा लीप ईयर वर्षी अधिक बिननावाचे दिवस जोडले जातात. फसली वर्षाची सुरुवात वसंत ऋतूच्या प्रारंभापासून होते.

Web Title: Gudi Padwa 2023: As Gudi Padwa welcomes the new year in Maharashtra, let's know what is the tradition of the new year in other states!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.