गुप्त नवरात्रातील दुर्गाष्टमी: ‘या’ शुभयोगात दुर्गापूजन, हे स्तोत्र म्हणा; दुप्पट लाभ मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 01:52 PM2024-07-13T13:52:10+5:302024-07-13T13:52:25+5:30
Ashadha Gupt Navratri Durga Ashtami 2024: गुप्त नवरात्री सुरू असून, नवरात्रातील दुर्गाष्टमीला देवीचे एक प्रभावी स्तोत्र म्हणणे शुभ पुण्यदायी मानले गेले आहे. जाणून घ्या...
Ashadha Gupt Navratri Durga Ashtami 2024: वर्षभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या चार नवरात्रांपैकी पहिली गुप्त नवरात्री सुरू आहे. मराठी वर्षभरातील पहिली गुप्त नवरात्री आषाढ प्रतिपदेपासून सुरू झाली आहे. ०६ जुलै ते १५ जुलै या कालावधीत गुप्त नवरात्री असून, १४ जुलै रोजी दुर्गाष्टमी आहे. दुर्गाष्टमीला जुळून येत असलेले शुभ योग, तसेच प्रभावी स्तोत्र यांबाबत जाणून घेऊया...
नवरात्री म्हणजे देवी दुर्गा, भगवतीच्या नऊ रूपांची, नऊ शक्तींची आराधना करण्याचे दिवस. गुप्त नवरात्रीत एखाद्या विशेष मनोकामनांची पूर्तीसाठी, तंत्र साधना करण्यासाठी व्रताचरण केले जाते. गुप्त नवरात्रीत तप, साधना केल्यास दुर्मिळ सिद्धी प्राप्त होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गुप्त नवरात्रीचे ९ दिवस विशेष मंत्रांचा जप, नामस्मरण, साधना केल्याने व्यक्तीला देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो. जीवनात सुख-समृद्धी येते. सर्व प्रकारची दुःखे दूर होतात. या दिवसांत दहा महाविद्या केल्या जातात. ही साधना गुप्तपणे केली जाते, असे म्हटले जाते.
गुप्त नवरात्रीतील दुर्गाष्टमीला जुळून येत असलेले शुभ योग
गुप्त नवरात्रीतील दुर्गाष्टमीला अद्भूत शुभ योग जुळून येत असून, या योगात दुर्गा देवीची पूजा केल्यास दुप्पट फळ मिळू शकेल. तसेच घरात आनंदाचे आगमन होऊ शकते, असे सांगितले जाते. आषाढ शुद्ध अष्टमी तिथी १३ जुलै २०२४ रोजी दुपारी ०३ वाजून ०५ मिनिटांनी सुरू होत असून, १४ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ०५ वाजून ५२ मिनिटांनी समाप्त होत आहे. भारतीय पंचांग पद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे १४ जुलै रोजी दुर्गाष्टमीचे पूजन करावे, असे सांगितले जात आहे. दुर्गाष्टमीला रवि योग, अभिजित मुहूर्त, विजय मुहूर्त, अमृत काल असे शुभ योग जुळून येत आहेत.
असे करा दुर्गा देवीचे पूजन
सकाळी लवकर उठून स्नानादि कार्य आटोपल्यानंतर एका चौरंगावर दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. चौरंगावर लाल वस्त्र घालावे. यानंतर दुर्गा देवीच्या पूजनाचा संकल्प करावा. दुर्गा देवीचे षोडशोपचार पूजन करावे. यानंतर देवीला लाल रंगाचे फूल अर्पण करावे. देवीच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. धूप, दीप दाखवून आरती करावी. देवीला मनापासून नमस्कार करावा. शक्य असेल तर दुर्गा चालिसा स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे. तसेच कुंजिका स्तोत्राचे पठण करणे लाभदायक मानले जाते.
सिद्ध कुंजिका स्तोत्र
शिव उवाच
शृणु देवि प्रवक्ष्यामि, कुञ्जिकास्तोत्रमुत्तमम्।
येन मन्त्रप्रभावेण चण्डीजापः शुभो भवेत॥१॥
न कवचं नार्गलास्तोत्रं कीलकं न रहस्यकम्।
न सूक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनम्॥२॥
कुञ्जिकापाठमात्रेण दुर्गापाठफलं लभेत्।
अति गुह्यतरं देवि देवानामपि दुर्लभम्॥३॥
गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वति।
मारणं मोहनं वश्यं स्तम्भनोच्चाटनादिकम्।
पाठमात्रेण संसिद्ध्येत् कुञ्जिकास्तोत्रमुत्तमम्॥४॥
अथ मन्त्रः॥
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ॐ ग्लौ हुं क्लीं जूं स:
ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल
ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा।
इति मन्त्रः॥
नमस्ते रूद्ररूपिण्यै नमस्ते मधुमर्दिनि।
नमः कैटभहारिण्यै नमस्ते महिषार्दिनि॥१॥
नमस्ते शुम्भहन्त्र्यै च निशुम्भासुरघातिनि॥२॥
जाग्रतं हि महादेवि जपं सिद्धं कुरूष्व मे।
ऐंकारी सृष्टिरूपायै ह्रींकारी प्रतिपालिका॥३॥
क्लींकारी कामरूपिण्यै बीजरूपे नमोऽस्तु ते।
चामुण्डा चण्डघाती च यैकारी वरदायिनी॥४॥
विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मन्त्ररूपिणि॥५॥
धां धीं धूं धूर्जटेः पत्नी वां वीं वूं वागधीश्वरी।
क्रां क्रीं क्रूं कालिका देवि शां शीं शूं मे शुभं कुरु॥६॥
हुं हुं हुंकाररूपिण्यै जं जं जं जम्भनादिनी।
भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः॥७॥
अं कं चं टं तं पं यं शं वीं दुं ऐं वीं हं क्षं
धिजाग्रं धिजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा॥
पां पीं पूं पार्वती पूर्णा खां खीं खूं खेचरी तथा॥८॥
सां सीं सूं सप्तशती देव्या मन्त्रसिद्धिं कुरुष्व मे॥
इदं तु कुञ्जिकास्तोत्रं मन्त्रजागर्तिहेतवे।
अभक्ते नैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वति॥
यस्तु कुञ्जिकाया देवि हीनां सप्तशतीं पठेत्।
न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदनं यथा॥
इति श्रीरुद्रयामले गौरीतन्त्रे शिवपार्वतीसंवादे कुञ्जिकास्तोत्रं सम्पूर्णम्।
॥ॐ तत्सत्॥
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.