भवसागर पार करण्यासाठी गुरुरूपी नावाडी हवाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 05:11 PM2020-12-12T17:11:55+5:302020-12-12T17:12:36+5:30

रथ आहे खरा, पण त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल, तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ गाडी माझी आहे, म्हणून ती मालकाला चालवता येणार नाह. साधी बैलगाडी सुद्धा चालवता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्यामध्ये पडतो. सद्गुरु हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरुपी गाडीला योग्य रस्त्यावर नेतात.

Guru-like boatman is required to cross Bhavsagar! | भवसागर पार करण्यासाठी गुरुरूपी नावाडी हवाच!

भवसागर पार करण्यासाठी गुरुरूपी नावाडी हवाच!

googlenewsNext

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शक लागतोच. आपण कितीही स्वयंभू म्हणवून घेतले, तरी दुसऱ्याच्या मदतीशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. ती मदत किरकोळ का असेना. बुडत्याला काडीचा आधारही पुरतो. त्याप्रमाणे भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या जीवाला गुरुरुपी काडीचा आधार हवाच. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात-

सद्गुरुंची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरु सांगतात. आपले चुकते कुठे ते सद्गुरु सांगतात. सद्गुरु आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरु जागे करण्याचे काम करतात. मला करायचेच काही उरले नाही, असे ज्याने म्हटले, त्याने खरोखरच सद्गुरु केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तु गृहस्थ मी स्वस्थ आहे, असे म्हणतो, पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते, तोपर्यंत तो स्वस्थ आहे, असे नाही म्हणता येणार.

हेही वाचा : आधी गुरुपारख, मगच गुरुसेवा!

शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात. जो शरण जातो, त्याचा कार्यभार सद्गुरु उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली, तो खरा गुरु. जे चिरकाल टिकते, ते गुरुपद समजावे. खरोखर, सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरुने सांगितलेले अक्षरश; पाळने हेच खरे साधन. संत कुणालाही कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो, तो महत्त्वाचा आहे. पुष्काळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्ये ठरली आहेत, ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला, तर पुढे वाढतो. त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल. आपले कर्तव्य कोणते, ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात.

रथ आहे खरा, पण त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल, तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ गाडी माझी आहे, म्हणून ती मालकाला चालवता येणार नाह. साधी बैलगाडी सुद्धा चालवता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्यामध्ये पडतो. सद्गुरु हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरुपी गाडीला योग्य रस्त्यावर नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही. आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल, तेवढेच आपल्याला मिळणार आहे. अशी आपली वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल. मनाची ही वृत्ती झाली, की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेने घडेल असे आपल्याला वाटू लागेल. असे वाटू लागले, की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंत:कराची शुद्धता हा पाया आहे.

हेही वाचा : परमार्थाच्या नावावर पाखंडीपणा करणाऱ्यांचा संत कबीरांनी आपल्या पदातून घेतला समाचार!

Web Title: Guru-like boatman is required to cross Bhavsagar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.