Guru Gochar 2022 : 'गुरु' होजा शुरु! २०२३ पर्यंत 'या' तीन राशींना मिळणार गुरुचे पाठबळ, दूर होणार आर्थिक अडचणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 08:00 AM2022-05-11T08:00:00+5:302022-05-11T08:00:07+5:30
Guru Gochar 2022 : ज्योतिष शास्त्रात गुरु हा शुभ ग्रह मानला जातो कारण हा ग्रह व्यक्तीच्या कुंडलीत शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीचे भाग्य उजळते. जीवनात यश, समृद्धी आणि सुखी वैवाहिक जीवन प्राप्त होते.
ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व राशींसाठी बृहस्पतिचे स्थित्यंतर खूप महत्वाचे असते. १२ एप्रिल रोजी गुरूने त्याच्या आवडत्या राशीत अर्थात मीन राशीत प्रवेश केला आहे, तो पुढील एक वर्ष या राशीत राहील. देवगुरूचा दर्जा असलेला गुरु ग्रह १ वर्षात राशी बदलतो. म्हणजेच, आता ते पुढील वर्षी एप्रिल २०२२ मध्ये तो राशीबदल करेल. तोवर पुढील तीन राशींसाठी गुरूचा मुक्काम कसा लाभदायक ठरणार आहे ते पाहू.
वृषभ : गुरूचा मीन राशीत प्रवेश होताच वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू झाले आहेत. येत्या १ वर्षात गुरु ग्रह त्यांना भरपूर लाभ देईल. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. करिअरबाबतचे मोठे स्वप्न पूर्ण होऊ शकते, असे म्हणता येईल. उत्पन्नात जोरदार वाढ होईल त्यामुळे सर्व आर्थिक समस्या दूर होतील. आपापल्या कार्यक्षेत्रात तुम्ही उत्तम काम कराल आणि सर्वांकडून प्रशंसा मिळवाल. याशिवाय वैवाहिक जीवनासाठीही हा काळ आनंददायी राहील. अविवाहितांना जोडीदार मिळेल. लग्नासाठी हा काळ उत्तम राहील.
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअर-व्यवसायात खूप शुभ परिणाम देईल. त्यांना प्रमोशन मिळू शकते. पगार वाढू शकतो. नोकरदारांना मोठे पद मिळू शकते. व्यापाऱ्यांचे आपल्या क्षेत्रात वर्चस्व निर्माण होईल. उत्पन्न आणि नफा वाढेल. विशेषत: मीडिया आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होईल. कुटुंबात आनंद दायी वातावरण राहील. घरात शुभ घटना, शुभ कार्य घडेल.
कर्क : कर्क राशीच्या लोकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यांची ध्येय, उद्दिष्ट सफल होऊन आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. आत्तापर्यंत रखडलेल्या कामांना गती मिळेल. प्रवास होतील आणि प्रवासातून करिअरला नवीन दिशा मिळेल. व्यावसायिकांना व्यवहारात आर्थिक फायदे होतील. त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवणे सोपे जाईल. व्यवसायाबाबत त्यांनी जी उद्दिष्टे ठेवली होती, ती पूर्ण होतील. शत्रूंवर विजय मिळेल. आर्थिक अडचणी दूर झाल्युमुळे कुटुंबात आनंद दायी वातावरण राहील.