Guru Pradosh 2023 : कर्जबाजारी असाल तर १५ जून रोजी गुरु प्रदोष व्रत अवश्य करा; निश्चित होईल लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 12:31 PM2023-06-14T12:31:42+5:302023-06-14T12:31:57+5:30

Guru Pradosh 2023 : आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर गुरूंचे मार्गदर्शन आणि कुंडलीत गुरुचे पाठबळ चांगले असावे लागते, त्यासाठी हे गुरु प्रदोष व्रत!

Guru Pradosh 2023 : If you are in debt, do Guru Pradosh fast on 15 th june; The benefits will be determined! | Guru Pradosh 2023 : कर्जबाजारी असाल तर १५ जून रोजी गुरु प्रदोष व्रत अवश्य करा; निश्चित होईल लाभ!

Guru Pradosh 2023 : कर्जबाजारी असाल तर १५ जून रोजी गुरु प्रदोष व्रत अवश्य करा; निश्चित होईल लाभ!

googlenewsNext

दर महिन्यात दोन पक्ष येतात कृष्ण पक्ष आणि शुद्ध पक्ष. १५ जून रोजी कृष्ण पक्षातील प्रदोष व्रत येत आहे. प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ होय. प्रदोष काळ म्हणजेच गोधुली बेला (संध्याकाळी) या दरम्यान पूजा केल्यास प्रदोष व्रत अधिक शुभ मानले जाते. 

प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते.  प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. हे व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. 

पौराणिक कथा : असे म्हणतात, की हे व्रत सर्वप्रथम चंद्र देवाने केले होते. त्याला क्षयरोग झाला होता. भगवान शिवाला प्रसन्न करून त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिंगत होण्याचा वर मागून घेतला.

अनेक कुटुंबात हे व्रत पिढ्यानपिढ्या केले जाते. या व्रतामुळे माणसाचे कौटुंबिक व ऐहिक जीवन सुखाचे होते. एवढेच नाही तर भक्ती व उपासनेत प्रगती होऊन पारमार्थिक आनंद मिळतो. भौम प्रदोषामुळे आर्थिक प्रश्न सुटतात. धनप्राप्ती होऊन कर्जबाजारीपणा दूर होतो. शनी प्रदोषामुळे संतान प्राप्ती होते. संतानाचे दोष दूर होतात. हे व्रत शक्यतो उत्तरायणात सुरू करतात. कारण हा काळ पारमार्थिक दृष्ट्या इष्ट काल मानला जातो. हे व्रत स्त्री-पुरुष दोघेही करू शकतात. 

प्रदोषाच्या दिवशी पूर्ण दिवस उपास करून सूर्यास्ताच्या वेळी शिवपूजा करतात. भोलेनाथाला दही भाताचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य गायीला किंवा गरजू व्यक्तीला दान करतात मग घरी येऊन उपास सोडतात.

Web Title: Guru Pradosh 2023 : If you are in debt, do Guru Pradosh fast on 15 th june; The benefits will be determined!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.