Guru Pradosh 2024: आनंद, ऐश्वर्यप्राप्तीसाठी आज प्रदोष मुहूर्तावर राशीनुसार करा शिव उपासना!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 02:06 PM2024-11-28T14:06:17+5:302024-11-28T14:06:53+5:30

Guru Pradosh 2024: आज गुरु प्रदोष आहे, यानिमित्त राशीनुसार शिव उपासना केली असता इच्छित फलप्राप्ती होते असे ज्योतीष शास्त्रात म्हटले आहे.

Guru Pradosh 2024: Worship Shiva according to your zodiac sign today on Pradosh Muhurta for happiness, prosperity! | Guru Pradosh 2024: आनंद, ऐश्वर्यप्राप्तीसाठी आज प्रदोष मुहूर्तावर राशीनुसार करा शिव उपासना!

Guru Pradosh 2024: आनंद, ऐश्वर्यप्राप्तीसाठी आज प्रदोष मुहूर्तावर राशीनुसार करा शिव उपासना!

सर्व दोषातून मुक्त करणारे व्रत म्हणजे प्रदोष व्रत आणि भगवान महादेवाची प्रिय तिथी म्हणजे शिवरात्री आणि आज गुरुवार, त्यामुळे गुरुकृपा प्राप्त करण्याचीही संधि! हे तिन्ही योग एकत्र आल्यामुळे शिव उपासनेची संधी दवडू नका. आज सायंकाळी गोरज मुहूर्तावर अर्थात सूर्यास्त काळात दिलेली उपासना करा. 

प्रदोष व्रत हे ज्योतिष शास्त्रात अत्यंत महत्त्वाचे व्रत मानले जाते. प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते.  प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. हे व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. 

गुरु प्रदोष निमित्ताने आपण शिव उपासने बरोबरच गुरु उपासना देखील केली पाहिजे आणि पुढे दिलेल्या गोष्टी राशीनुसार भोलेनाथाला अर्पण केल्या पाहिजेत. 

मेष: मेष राशीच्या लोकांनी भगवान शंकराला चंदनाचे गंध लावावे आणि 'ओम नमः शिवाय' मंत्रजप १०८ वेळा करावा. 

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी भगवान शंकराला दूध आणि पवित्र धागा अर्पण करावा. महादेवाचा श्लोक म्हणून तो धागा उजव्या मनगटाला बांधावा. 

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताच्या दिवशी भोलेनाथांना बेलपत्र अर्पण करावे.

कर्क : कर्क राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताला भगवान शंकराला बेल आणि पांढरी फुलं अर्पण करून शिवजप करावा. 

सिंह : सिंह राशीच्या लोकांनी या तिथीला महादेवाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 

कन्या : कन्या राशीच्या लोकांनी भगवान शंकराला दूध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालावा.

तूळ : तूळ राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराला मध, पांढरे चंदन आणि बेलाचे पान अर्पण करावे.

वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांनी या शुभ मुहूर्तावर भोलेनाथांना लाल धागा अर्पण करावा आणि प्रसाद रुपी आपल्या उजव्या मनगटावर बांधून घ्यावा. 

धनु: धनु राशीच्या लोकांनी या शुभ दिवशी भगवान शंकराला केशर मिश्रित जल अर्पण करावे.

मकर : मकर राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवाला निळी फुले आणि शमीची पाने अर्पण करावीत.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी या तिथीला भगवान शंकराला काळे तीळ अर्पण करावेत.

मीन: मीन राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान भोलेनाथांना नागकेसरचे फूल अर्पण करावे, ते मिळत नसल्यास कोणतेही पांढरे फुल अर्पण करावे. 

Web Title: Guru Pradosh 2024: Worship Shiva according to your zodiac sign today on Pradosh Muhurta for happiness, prosperity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.