Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमेनिमित्त जाणून घ्या व्यासपीठ कशाला म्हणतात ? वाचा महत्त्व आणि नियम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 12:39 PM2022-07-12T12:39:47+5:302022-07-12T12:40:17+5:30

Guru Purnima 2022: कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठाचा उल्लेख वारंवार होतो, त्या व्यासपीठाचे महत्त्व जाणून घेऊ.

Guru Purnima 2022: Learn on the occasion on Guru purnima, why stage called as Vyaspeeth? Read the importance and rules of it! | Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमेनिमित्त जाणून घ्या व्यासपीठ कशाला म्हणतात ? वाचा महत्त्व आणि नियम!

Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमेनिमित्त जाणून घ्या व्यासपीठ कशाला म्हणतात ? वाचा महत्त्व आणि नियम!

Next

आषाढी एकादशीनंतर चार दिवसांनी येणारा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. बालपणापासून आपण हा सण साजरा करत आलो आहोत. यंदा १३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. तिलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात

या दिवशी महर्षी व्यासांनी पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतला, अशी आपली श्रद्धा आहे. त्यामुळे संन्यासी मंडळी या दिवशी व्यासांची पूजा करतात. त्यासाठी स्नानदी नित्यकर्मानंतर संकल्पपूर्वक एक सुती धूतवस्त्र अंथरतात. त्याच्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेषा काढतात. हेच व्यासपीठ! त्यावर ब्रह्मा, विष्णू, वसिष्ठ, पराशर, शक्ती, व्यास, शुक्रदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकराचार्य यांना आवाहन केले जाते. त्यानंतर त्यांची विधीवत कृतज्ञतापूर्वक पूजा करतात. दक्षिणे. कडील शंकरपीठांमध्ये या दिवशी महोत्सवच असतो. 

ही विधीवत पद्धत आज अनेकांना माहित नसली, तरीदेखील कलासादरीकरणाला वाव देणाऱ्या व्यासांना स्मरून सादरीकरण मंचाला व्यासपीठ हे नाव दिले गेले. आजही कलाकार, वक्ते, व्याख्याते, कीर्तनकार, प्रवचनकार, त्या व्यासपीठाला वंदन करून मगच सादरीकरणाला सुरुवात करतात.

व्यास हे अखिल जगाचे गुरु आहेत. आपल्या संस्कृतीची मूळ संकल्पना ही व्यासांचीच आहे. त्यांनीच तिची जोपासना केली. व्यास आपले धर्म अध्यात्म वाङमय अशा सर्व विषयातील गुरु आहेत. त्यामुळे संस्कृती व्यासांचे असे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. याच दिवशी आपल्या मातापित्यांची आणि गुरुंची पूजा करण्याची प्रथा ओ. निष्ठावान शिष्य आणि आदर्श गुरु यांचे परस्परांशी असलेले नाते अन्य मंडळींना कळणारे नसते. शिष्याला आपला गुरु हा देवाहूनही श्रेष्ठ असतो. तर शिष्याला भवसागरातं पैलपार नेण्याची शक्ती केवळ गुरुंपाशीच असते. 

आजच्या काळात आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य मिळणे कठीण आहे. गुरुंकडे ज्ञान असले तरी शिष्याकडे शिकण्याची ओढ नसते  किंवा शिष्याची शिकायची तयारी असली, तरी त्याला योग्य गुरुंची साथ लाभत नाही. आजचे गुरु शिष्य व्यवहारी जगात अडकले आहेत. परंतु ज्ञानाची, अध्यात्माची, परमेश्वर प्राप्तीची तळमळ फारच कमी गुरुशिष्यांमध्ये आढळते.

तरीही अजूनही काही गुरुशिष्यांची जोडी अशी आहे, ज्यांनी अजूनपर्यंत या नात्याचे पावित्र्य जपत गुरुशिष्य परंपरा अबाधित ठेवली आहे. व्यासपीठाचा मान राखला आहे. या निमित्ताने आपणही आपल्या आयुष्याला वळण देणाऱ्या गुरुंचा मान राखुया. त्यांना गुरुदक्षिण देऊया आणि दत्त गुरुंचे दर्शन घेऊन गुरुपौर्णिमा साजरी करूया. 

 

Web Title: Guru Purnima 2022: Learn on the occasion on Guru purnima, why stage called as Vyaspeeth? Read the importance and rules of it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.