गुरुः साक्षात परब्रह्म... गुरुकृपेचे आपले अनुभव आम्हाला पाठवा, 'लोकमत भक्ती'द्वारे 'गुरुमहिमा' जगात पोहोचवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 10:06 AM2024-07-18T10:06:38+5:302024-07-18T10:07:11+5:30

Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेनिमित्त लोकमत भक्तीच्या वाचकांसाठी सुवर्ण संधी, आपले अनुभव आमच्याकडे पाठवण्याची आणि फोटोसह प्रसिद्धी मिळवण्याची; सविस्तर वाचा!

Guru Purnima 2024: Guru: Sakshat Parbrahm... Send us your experiences of Guru's grace, bring 'Guru Mahima' to the world through 'Lokmat Bhakti'! | गुरुः साक्षात परब्रह्म... गुरुकृपेचे आपले अनुभव आम्हाला पाठवा, 'लोकमत भक्ती'द्वारे 'गुरुमहिमा' जगात पोहोचवा!

गुरुः साक्षात परब्रह्म... गुरुकृपेचे आपले अनुभव आम्हाला पाठवा, 'लोकमत भक्ती'द्वारे 'गुरुमहिमा' जगात पोहोचवा!

२१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा येत आहे, त्या मुहूर्तावर नवीन उपक्रम सुरु करत आहोत, तो म्हणजे गुरुकृपेच्या अनुभवांचा! आजवर अनेक सेलिब्रेटींकडून आपण स्वामी भक्तीचा अनुभव, गजानन महाराजांच्या कृपेचा अनुभव, शिर्डीच्या साईबाबांचा अनुभवलेला चमत्कार याबद्दल ऐकले वाचले असेल. लोकमत भक्ती आता तीच संधी तुमच्यासाठी खुली करत आहे. 

गुरुकृपा झाली असता आपले आयुष्य पालटते, संकटातून सावरण्याची शक्ती मिळते, नवीन कार्यारंभ करण्याची प्रेरणा मिळते, विचारहीन आयुष्याला वळण मिळते. हे सारे अनुभव तुम्हालादेखील आयुष्यात कधी ना कधी नक्कीच आले असतील. तेच अनुभव सर्व वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकमत भक्ती घेऊन येत आहे 'गुरु अनुभूती' हे सदर! यात आपण शेअर केलेले अनुभव आपल्या फोटोसकट आणि माहितीसकट दर गुरुवारी लोकमत भक्तीच्या वेबपोर्टलवर प्रसिद्ध होईल. 

काय म्हणता ? अनुभव तर आहे पण चांगली लेखन शैली नाही, असा विचार करत असाल तर तेही टेन्शन सोडून द्या. कागद घ्या, पेन घ्या आणि तुम्हाला आलेला गुरुअनुभव लिहून काढा. मराठी टायपिंग करून लेख पाठवता आला तर उत्तम, नसेल तर आम्ही आहोतच! तुम्ही लिहिलेल्या लेखाचा फोटो काढून आम्हाला पाठवा. त्या अनुभवाला शब्दबद्ध करण्याची जबाबदारी आमची!

तुम्हाला फक्त तुमचे अनुभव तुमच्या फोटोसह आणि पूर्ण नावासह दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवायचे आहेत. मग वाट कसली पाहताय? तुम्हाला आलेला गुरुभक्तीचा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवूया आणि सर्व जण गुरुकृपेस पात्र होऊया.

Email ID: lokmatbhakti822@gmail.com

Web Title: Guru Purnima 2024: Guru: Sakshat Parbrahm... Send us your experiences of Guru's grace, bring 'Guru Mahima' to the world through 'Lokmat Bhakti'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.