Guru Pushyamrut Yoga 2023: गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर जाणून घ्या अत्यंत लाभदायी मंत्र आणि त्याची साधना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 06:28 PM2023-04-27T18:28:54+5:302023-04-27T18:29:21+5:30

Guru Pushyamrut Yoga 2023: गुरुपुष्यामृत मुहूर्तावर वैयक्तिक आणि आत्मिक सुखासाठी दिलेल्या मंत्राची उपासना आजपासून सुरू करा!

Guru Pushyamrut Yoga 2023: Learn very beneficial Mantras and its Sadhana on the occasion of Guru Pushyamrut! | Guru Pushyamrut Yoga 2023: गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर जाणून घ्या अत्यंत लाभदायी मंत्र आणि त्याची साधना!

Guru Pushyamrut Yoga 2023: गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर जाणून घ्या अत्यंत लाभदायी मंत्र आणि त्याची साधना!

googlenewsNext

>> सचिन मधुकर परांजपे, पालघर

“ॐ अनंताय नमः” हा इतकाच छोटासा षडाक्षरी मंत्र अत्यंत शुभ, अलौकिक आणि थेट वैश्विक शक्तीला जोडणारा दुवा आहे हे एक रहस्य आज खुले करतो आहे. अनंत हे श्रीविष्णुंच्या सहस्रनामांपैकी एक नाव आहे. विश्वात श्रीविष्णुंची किमान दशलक्ष नावे निरनिराळ्या विश्वात प्रचलित आहेत. त्यांचे शब्द, उच्चार आणि लिपी विभिन्न आहेत पण त्या प्रत्येक विश्वमितीत अनंत हे नाव सार्वत्रिक आहे हे आज सांगतो. आता याचं रहस्योद्घाटन. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा जो....

तुम्हाला जेव्हा जेव्हा नैराश्य येईल, एकटेपणा वाटेल, समोर अंधःकार दाटून आलाय असं वाटेल, मन उदास होईल तेव्हा एक करत जा. हातातलं काम थोडावेळ बाजूला ठेवा. एकेजागी शांतपणे बसा. श्वास शांतपणे घेत रहा. डोळे मीट आणि दोन्ही हातांचे तळवे उघडून ते गुडघे किंवा मांडीवर ठेवा ( open to sky) आणि अजिबात न मोजता, मनात “ॐअनंतायनमः” या दिव्य मंत्राचा अविरत पण शांतपणे, कमी गतीत जप करा. अनंत या शब्दावर मन एकाग्र करा...ॐ अ नं ता य न मः.... अनंत या शब्दाला आत झिरपू दे... खोलवर.... शांतपणे... आसपास काय चाललंय... सगळं विसरण्याचा प्रयत्न करा...

किती वेळ करायचा? वगैरे सोडा... मासिक पाळी, सोयरसुतक सगळं विसरा....शब्द आणि त्या शब्दातील स्पंदनं आत घे, स्विकार करा... युनिवर्सचा व्हॅक्युम क्लिनर ताबडतोब सुरु होईल...मनातली सगळी घाण, जळमटं, कचरा, नैराश्य ताबडतोब साफ केलं जाईल.... जप करत रहा. तुम्हाला छान वाटेपर्यंत... मन मोकळे होईपर्यंत...

जप संपला की तुम्हाला जाणवेल. परमेश्वराचं अस्तित्व आसपास.... विश्वशक्तीची ताकद... नैराश्य निघून जाईल. वैश्विक शक्तीशी तुम्ही कनेक्ट व्हाल... पण एक करायचं... काही मागायचे नाही...जे काही हवंय ते अनंत ठरवेल. तो श्रेयस्कर आहे तेच देईल....!

Web Title: Guru Pushyamrut Yoga 2023: Learn very beneficial Mantras and its Sadhana on the occasion of Guru Pushyamrut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.