Guru Pushyamrut Yoga 2023: श्रीराम नवमी आणि गुरुपुष्यामृत योग; या सुमुहूर्तावर लक्ष्मीप्राप्तीसाठी करा दिलेले उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 08:00 AM2023-03-30T08:00:00+5:302023-03-30T08:00:01+5:30

Guru Pushyamrut Yoga 2023: ३० मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सव आहे आणि त्याच दिवशी सायंकाळी गुरुपुष्यामृत योगदेखील आहे, त्याचा लाभ कसा करून घेता येईल बघा. 

Guru Pushyamrut Yoga 2023: Sri Ram Navami and Guru Pushyamrut Yoga; On this Sumuhurta, do the given measures to get Lakshmi! | Guru Pushyamrut Yoga 2023: श्रीराम नवमी आणि गुरुपुष्यामृत योग; या सुमुहूर्तावर लक्ष्मीप्राप्तीसाठी करा दिलेले उपाय!

Guru Pushyamrut Yoga 2023: श्रीराम नवमी आणि गुरुपुष्यामृत योग; या सुमुहूर्तावर लक्ष्मीप्राप्तीसाठी करा दिलेले उपाय!

googlenewsNext

विश्वाचा ताप हरण करणारे प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला ती आजचीच तिथी. श्रीरामांनी जसे धर्मरक्षण करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले त्याप्रमाणे आपणही आपल्या कार्यात यश मिळवायला हवे. त्यात आज गुरुपुष्यामृत योग. या दुहेरी शुभ मुहूर्तावर काय केले पाहिजे जाणून घ्या. 

गुरुपुष्यामृत योग मुहूर्त : ३० मार्च रोजी रात्री १०. ५८ पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३६ पर्यंत. 

गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत हा योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. हा योग खूप महत्वाचा मानला जातो. या मुहूर्तावर अनेक प्रकारच्या शुभ कार्याचा शुभारंभ केला जातो. 

पुष्यामृत गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे. म्हणूनच आपण याला अमृत योग असे संबोधितो. घरातील ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच देव्हाऱ्यात उजव्या कोपऱ्याला श्रीसुक्त , पुरुषसुक्त वाचून व पंचोपचार पूजा करून कलश स्थापना केल्यास घरात धन-धान्य वृद्धी व लक्ष्मीप्राप्ती होते. त्यासाठी पुढीलप्रमाणे कलश स्थापना करावी :-

एक चौरंग, एक पाट, चौरांगाभोवती आंब्याच्या चार डगळे लावावेत. चौरंगावर शुभ्र पांढरे वस्त्र टाकावे. त्यावर मध्यभागी थोडे तांदूळ टाकावे. त्यावर एक कलश, त्यात पाणी, नाणे व सुपारी टाकून ठेवावा. त्यात पाच विड्याची पाने ठेवावीत. त्यावर श्रीफळ ठेवावे.

आपण पूजेकरिता भरून घेतलेल्या कलशात गंध, अक्षता व फुले टाकावीत व खालील मंत्र म्हणावा -
कलश देवताभ्यो नम: || 
सकलपूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि समर्पयामि ||
प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि ||

कलशाला गंध लावताना : -
श्री कलश देवताभ्यो नम: | विलेपनार्थ चंदनम् समर्पयामि ||
 
२) कलशाला अक्षता व हळद-कुंकू वाहताना : -
श्री कलश देवताभ्यो नम: | अलंकारार्थे अक्षताम् समर्पयामि || 
हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ||

३) कलशाला फूल वाहताना : -
श्री कलश देवताभ्यो नम: | ऋतुकालोद्धव पुष्पम समर्पयामि ||

४) कलशाला आगरबत्ती ओवाळताना : 
श्री कलश देवताभ्यो नम: | धूपम् आघ्रपयामि ||

५) कलशाला दीप ओवाळताना : -
श्री कलश देवताभ्यो नम: | दीपं दर्शयामि ||

६)कलशासमोर पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर खडीसाखरेची वाटी ठेऊन गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीत तुळशीची पान ठेवावे. नंतर दुसरे तुळशीचे पान घेऊन तीनवेळा वाटी भोवती फिरवावे व फिरवताना खालील मंत्र म्हणावा : - 

सत्यंत वर्तेन परिसिंचयामी ओम तत्सवितूरवरेण्यं | 
भर्गो देवस्य धिमही धियो यो न: प्रचोदयात |

७) नंतर तुळशीचे पान कलशासमोर ठेवतांना खालील मंत्र म्हणावा:
ओम प्राणाय स्वाहा | ओम अपानाय स्वाहा | 
ओम व्यानाय स्वाहा | ओम उदानाय स्वाहा | 
ओम सामान्य स्वाहा | ओम ब्राम्हणे अमृतत्वाय स्वाहा ||

पुन्हा एकदा दुसरे तुळशीचे पान घेऊन वरीलप्रमाणे तीनवेळा फिरवून मंत्र म्हणून कलशासमोर ठेवावे. अशाप्रकारे गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर पूजा विधी पार पाडला जातो. 

ही पूजा करण्यासाठी दहा मिनिटांच्या वर वेळ लागणार नाही, त्यामुळे गुरुपुष्यामृत योग रात्री उशिरा सुरू होत असला तरी पूजा त्या वेळेत सहज पार पाडता येईल. थोडी तजवीज करावी लागेल, पण त्याचे फळ उत्तम मिळेल हे नक्की!

Web Title: Guru Pushyamrut Yoga 2023: Sri Ram Navami and Guru Pushyamrut Yoga; On this Sumuhurta, do the given measures to get Lakshmi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.