गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 07:07 AM2024-10-24T07:07:07+5:302024-10-24T07:07:07+5:30

Swami Samarth Maharaj Aarti Pradakshina And Aarti Guruvar Chi: गुरुपुष्यामृत योगावर स्वामींचे प्रिय शिष्य आनंदनाथ महाराजांनी रचलेली आरती आवर्जून म्हणावी.

gurupushyamrut yoga october 2024 recite this anandnath maharaj compose swami samarth maharaj aarti pradakshina and aarti guruwar chi in marathi | गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची

गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची

Swami Samarth Maharaj Aarti Pradakshina And Aarti Guruvar Chi: २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०६ वाजून ३८ मिनिटांपासून गुरुपुष्यामृत योग सुरू होत असून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार सकाळी ०६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृतयोग असणार आहे. संपूर्ण दिवस हा योग असणे विशेष मानले जात आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. या दिवशी स्वामींची विशेष पूजन सेवा करावी, असे म्हटले जात आहे. असे केल्याने स्वामींच्या अमृत कृपेचा लाभ मिळू शकतो, असे सांगितले जाते. (Guru Pushya Yoga October 2024)

या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. या दिवशी दर गुरुवारप्रमाणे स्वामींचे पूजन, नामस्मरण, सेवा करावी. आपला नित्यक्रम चुकवू नये. स्वामींच्या मंत्रांचा जप, स्तोत्रांचे पठण करावे. त्यानंतर शक्य असेल तर आवर्जून सर्वांनी एकत्र येऊन स्वामींची आरती म्हणावी. यावेळेस आरती प्रदक्षिणा आणि आरती गुरुवारची म्हणावी. आनंदनाथ महाराज हे स्वामींचे प्रिय शिष्य होते. स्वामीसुत हरिभाऊ तावडे नंतर स्वामींचे आत्मलिंग मिळालेली दूसरी एकमेव व्यक्ति म्हणजेच हे आनंदनाथ महाराज होते. आनंदनाथ महाराजांनी स्वामींवर अनेक स्तोत्रे, आरत्या यांची रसाळ भाषेत रचना केली आहे. ही स्तोत्रे अत्यंत प्रभावी मानली जातात. आनंदनाथ महाराजांनीच आरती प्रदक्षिणा आणि आरती गुरुवारची रचना केली आहे. यानिमित्ताने स्वामींचे स्मरण करूया...

स्वामी समर्थ महाराज आरती गुरुवारची

आरती गुरुवारची ।। भवभार संसार हराची ।। धृ।। 

आठही वारी ज्याची ।। खरी महिमा साची ।।१।। 

सर्वही देवी पहाता ।। अघटीत हे गुरुसत्ता ।। ऐशी महिमा ज्याची ।।२।। 

उपोषण जागरण नेमे करिता ।। नाही चिंता संसाराची ।।३।। 

निजहित बोध बोधे ।। सुखकर वाणी आनंदाची ।।४।।

स्वामी समर्थ महाराज आरती प्रदक्षिणा

धन्य तारक प्रदक्षणा या श्रीगुरुरायाची ।। आवड झाली भक्तजनाला भव उतरायाची ।। धृ।। 

प्रदक्षणा करितां दुरित भार हा जाळी ।। एक एक पाऊली कोटी तीर्थे आंघोळी ।।१।। 

कोटीकोटी अश्वमेध एक पाउली ।। स्वामिनाम मुखी गाता गाता पुण्याची ही बोली ।। २ ।। 

कोटी कन्यादान शतकोटी या कपिला ।। मेरुतुल्य कांचन देतां भार नसे पाउला ।।३।। 

दगड पाषाण तरुवर तरती जाणा ज्या नामे ।। पदोपदी हे पुण्यची भारी तुटली भवभ्रमे ।।४।। 

भूत पिशाच्च समंध जाती प्रदक्षणा केल्या ।। बहात्तर रोग कर जोडीती तीर्थे सेवील्या ।।५।। 

देवादिक हे कर जोडीती जाणा तद्भक्ता ।। प्रदक्षणा ही करितां भावे नाही कधी चिंता ।। ६ ।। 

पूर्वज तरती नाकी जाती होती सुखरूप ।। स्वामिनाम प्रदक्षणे कार्य साधे नको जपतप ।।७।। 

म्हणुनी जना हे सांगतसे मी निज सुख जाणा ।। स्वामी आनंदनाथ हा करुणा वचने बोधितसे मना ।।८।।

।। श्री स्वामी समर्थ ।।

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

 

Web Title: gurupushyamrut yoga october 2024 recite this anandnath maharaj compose swami samarth maharaj aarti pradakshina and aarti guruwar chi in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.