Hanuman Jayanti 2022 : शेपूट असूनही हनुमंत 'वानर' नव्हते, हे सांगणारे वाल्मिकी रामायणातील काही प्रसंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:46 AM2022-04-13T11:46:47+5:302022-04-13T11:47:12+5:30

Hanuman Jayanti 2022 : वाल्मीकींनी हनुमानाचा उल्लेख `वानर', `कपी', `शाखामृग' इत्यादी नावांनी केला आहे. इतकेच नव्हे तर त्याला पुच्छधारी म्हणून चित्रित केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात `हनुमान वानर की नर?' असा प्रश्न उत्पन्न होतो.

Hanuman Jayanti 2022: Despite the tail, Hanumantha was not an 'ape', some incidents in Valmiki Ramayana say | Hanuman Jayanti 2022 : शेपूट असूनही हनुमंत 'वानर' नव्हते, हे सांगणारे वाल्मिकी रामायणातील काही प्रसंग!

Hanuman Jayanti 2022 : शेपूट असूनही हनुमंत 'वानर' नव्हते, हे सांगणारे वाल्मिकी रामायणातील काही प्रसंग!

googlenewsNext

सर्वसामान्य लोक हनुमान, वाली, सुग्रीव इत्यादींना वानर म्हणजे खरोखरच शेपटी असलेले पशू वानर समजतात. कारण त्यांच्या दृष्टीने ते मनुष्य नव्हेत. आजही वानरांकडे पशूंपेक्षा वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते, ते रामायणातील हनुमा, अंगद इ. वानर पात्रांकडे पहावयाच्या दृष्टीकोनाच्या प्रभावामुळेच असावे, परंतु वानर समाज आणि संस्कृतीनचे वाल्मीकी रामायणात जे चित्रण पहावयास मिळते, त्याचा बारकाईने विचार केल्यास असे ठामपणे म्हणता येते, की वानर समाज वस्तुत: काल्पनिक समाज नाही, वानर हे मनुष्यच होते व त्या समाजाची स्वत:ची अशी सामाजिक व्यवस्था होती, स्वत:ची संस्कृती होती. ते पराक्रमी, शूर आणि सशक्त होते.

वाल्मीकींनी हनुमानाचा उल्लेख `वानर', `कपी', `शाखामृग' इत्यादी नावांनी केला आहे. इतकेच नव्हे तर त्याला पुच्छधारी म्हणून चित्रित केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात `हनुमान वानर की नर?' असा प्रश्न उत्पन्न होतो. परंतु हनुमानाचे पुच्छ हे हात, पाय याप्रमाणे त्याच्या शरीराचे अवयव नव्हते. ते त्याच्या समाजाचे विशिष्ट चिन्ह असावे, व ते बाहेरून शरीराला जोडण्यात येत असावे. रावणाने हे पुच्छ वानरांचे सर्वाधिक प्रिय भूषण आहे, असे म्हटले आहे. 

वानरांची उड्या मारण्याची, धावण्याची प्रवृत्ती सूचित करण्याच्या दृष्टीने `प्लवंग', `प्ववंगम' हे शब्द सार्थ आहेत. हनुमान धावण्याच्या कलेत निपुण होता. `कपि' या शब्दाचा सामान्य अर्थ `वानर' असा आहे. रामायणात हे कपी किंवा वानर पुच्छधारी म्हटलेले आहेत. त्यामुळे हनुमानाला मनुष्य म्हणण्यात मोठी अडचण येते. 

पुच्छ बाहेरून शरीराला जोडण्यात येत असल्यामुळे ते पेटवूनही हनुमानाला कोणतीही शारीरिक पीडा झाली नव्हती. पुच्छाचे वर्णन रामायणात विशेषत: हनुमानाच्या संदर्भात आणि तेही लंकादहन प्रसंगात आलेले आहे. वाली, सुग्रीव, अंगद आणि वानरस्त्रिया यांना पुच्छ असल्याचा खास उल्लेख रामायणात नाही.

वानर नसूनही त्यांच्यासारखी वाटणारी शरीराची ठेवण, रंग रूप, काही मानसिक व शारीरिक प्रवृत्ती यात, हनुमान इत्यादींच्या तथाकथित वानर समाजात आणि प्रत्यक्ष वानरांत साम्य दिसून येत असावे. चापल्य, निरंकुश स्वभाव, केसाळ शरीर, उड्या मारण्याची प्रवृत्ती, विलास प्रियता, स्त्री-पुरुष संबंधात नीतिनियमांचे शैथिल्य, पर्वत दऱ्यात वास्तव्य, वृक्षशाखा-नखे-दात यांचा शस्त्रासारखा उपयोग करणे इ. प्रवृत्ती पाहून आयांनी त्यांनी `वानर' या नावाने संबोधले असावे. वास्तविक वानर पुच्छधारी पशू नव्हते. ते भारतातील आर्येतर आदिवासी होते. आर्यांच्या मानाने ते बरेच मागासलेले होते, पण हळूहळू आर्य संस्कृतीचा प्रभाव त्यांच्यावर पडत गेला.

इतिहास संशोधकांनी पुच्छ लावून घेणाऱ्या व्यक्तींचा व मानवजातीनचा शोध लावलेला आहे. मातृगुप्त नावाचा एक बंगाली कवी हनुमानाचा अवतार मानला जात असे व तो प्रसंगी पुच्छ धारण करत असे् शबर नावाचे आदिवासी आजही उत्सवाचेवेळी पुच्छ धारण करतात.

अंदमान निकोबारमध्ये पुच्छ धारण करणारी एक आदिवासी जमात आहे, असा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एके ठिकाणी केला आहे. अशाच एखाद्या आदिवासी जमातींपैकी हनुमान हा वानरवंशोत्पन्न परमप्रतापी पुरुष असावा.

Web Title: Hanuman Jayanti 2022: Despite the tail, Hanumantha was not an 'ape', some incidents in Valmiki Ramayana say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.