Hanuman Jayanti 2022 : यंदा शनिवारी हनुमान जयंती; हनुमंत आणि शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी जुळून आलाय खास योग!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 02:38 PM2022-04-07T14:38:59+5:302022-04-07T14:41:58+5:30
Hanuman Jayanti 2022 : हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी श्रीराम आणि हनुमंत भक्त उपवास करून त्यांची श्रद्धेने पूजा करतात.
चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी भक्त उपवास ठेवतात आणि पूर्ण भक्तिभावाने हनुमंताची पूजा करतात. यावर्षी हनुमान जयंती (हनुमान जयंती 2022) १६ एप्रिल रोजी साजरी केली जाईल. यावेळी हनुमान जयंती शनिवारी येत आहे. अशा स्थितीत त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे, कारण मंगळवार आणि शनिवार हनुमंताला समर्पित मानले जातात. चला जाणून घेऊया हनुमान जयंतीची शुभ वेळ आणि पूजेची पद्धत.
पंचांगानुसार या वर्षी चैत्र महिन्याची पौर्णिमा १५ एप्रिल रोजी मध्यरात्री २.२५ पासून सुरू होईल. तर पौर्णिमा १६ एप्रिल रोजी रात्री १२.२४ वाजता समाप्त होईल. हनुमान जयंतीचे व्रत उदय तिथीला ठेवले जाते. कारण सूर्योदयाच्या वेळेस हनुमानाचा जन्म झाला होता. म्हणून १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे.
याशिवाय यंदा हनुमान जयंतीच्या दिवशी रवि आणि हर्ष योगाचा योगही जुळून येत आहे. यासोबतच हस्त आणि चित्रा नक्षत्राचाही योगायोग असेल. या दिवशी पहाटे ५.५५ ते ८.४० पर्यंत रवि योग राहील. असे मानले जाते की रवि योगात केलेले कोणतेही काम शुभ फळ देते.
या दिवशी हनुमंताला प्रसन्न करण्यासाठी तुपाचा चारमुखी दिवा लावावा. यानंतर हनुमंताच्या प्रतिमेसमोर किंवा चित्रासमोर ११ वेळा हनुमान चालिसाचा म्हणा. पूजेत झेंडू, कण्हेर किंवा गुलाबाची फुले वापरावीत. हनुमंताला त्याच्या आवडीचा रुईच्या पानाफुलांचा हार घालावा. शेंदूर वाहावे. व मालपुआ, लाडू, केळी, पेरू इत्यादी नैवेद्य अर्पण करावा. असे केल्याने हनुमंत प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. नियमानुसार या दिवशी पूजा केल्याने शनीच्या प्रकोपापासूनही मुक्तता मिळते.