Hanuman Jayanti 2022 : तुम रक्षक काहु को डरना; सर्व प्रकारच्या भितींपासून मुक्ती देणारे हनुमंताचे सिद्धमंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 05:23 PM2022-04-15T17:23:06+5:302022-04-15T17:23:55+5:30

Hanuman Jayanti 2022 : दररोज स्नान केल्यानंतर किंवा भोजनापूर्वी बारा वेळा महामंत्राचा जप केल्यास ईप्सित साध्य होते.

Hanuman Jayanti 2022: Siddha Mantra of Hanumanta which gives freedom from all kinds of fears! | Hanuman Jayanti 2022 : तुम रक्षक काहु को डरना; सर्व प्रकारच्या भितींपासून मुक्ती देणारे हनुमंताचे सिद्धमंत्र!

Hanuman Jayanti 2022 : तुम रक्षक काहु को डरना; सर्व प्रकारच्या भितींपासून मुक्ती देणारे हनुमंताचे सिद्धमंत्र!

googlenewsNext

हनुमंताची भक्ती सर्वपरिचित आहे. पण भक्ताची भक्ती करणे हा देखील सुखद अनुभव असतो. हनुमंताप्रमाणे शक्ती, युक्ती आणि बुद्धी हवी असेल, तर पुढील प्रभावी मंत्राचा मनोभावे जप करावा. हा मंत्रजप सुरू करण्यासाठी हनुमान जयंतीहून दुसरे चांगले औचित्य ते कोणते? चला तर मग, शुभस्य शीघ्रम!

दररोज स्नान केल्यानंतर किंवा भोजनापूर्वी बारा वेळा महामंत्राचा जप केल्यास ईप्सित साध्य होते. याशिवाय हनुमानाचे अनेक सिद्धमंत्र आहेत. त्यापैकी काही असे-

नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा!'
या मंत्राच्या १०८ जपाने आरोग्य व लक्ष्मीची प्राप्ती होते. इतकेच नव्हे तर अकस्मात उद्भवणारी अरिष्टे आणि आपत्तीही दूर होते. त्यासाठी

तप्तचामीकरनिभं भीघ्नं संविहितांजलिम
चलत्कुण्डदीप्तास्यं पद्माक्षं मारुति स्मरेत

या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. अणिमा, गरिमा, ईशित्व, वशित्व, प्राकाम्य इ. अष्टसिद्धींच्या प्राप्तीसाठी 

हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट

सौख्यप्राप्तीसाठी या द्वादशाक्षरी मंत्राचा एक लाख जप करावा.

वामे शैलं वैरिभिदं विशुद्धं टंकमन्यत:
दधानं स्वर्णवर्णंच घ्यायेत कुंडलिनं हरिम

या मंत्राचा १०८ वेळा याप्रमाणे सलग ९० दिवस जप करावा.

अंजनीगर्भसंभूत कपीन्द्र सचिवोत्तम,
रामप्रिय नमस्तुभ्यं हनुमत रक्ष सर्वदा।

स्वसंरक्षणासाठी वरील मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

मर्कटेश महोत्साह सर्वशोक विनाशन,
शत्रूने संहर मां रक्ष श्रियं दापय मे प्रभो।

शत्रू पराभवासाठी वरील मंत्राचा १०८ वेळा जप करावा. 

Web Title: Hanuman Jayanti 2022: Siddha Mantra of Hanumanta which gives freedom from all kinds of fears!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.