Hanuman Jayanti 2023: श्रीरामाप्रमाणे हनुमंताला देवत्त्व प्राप्त झाले पण का? त्याचे उत्तर सापडते किष्किंधाकांडात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 12:22 PM2023-04-03T12:22:52+5:302023-04-03T12:23:44+5:30

Hanuman Jayanti 2023: श्रीराम प्रभूंची भावंडे त्यांच्यासारखीच गुणी, पराक्रमी असूनसुद्धा भक्त हनुमंताला देवत्त्व प्राप्त झाले, पण अन्य भावंडांना नाही; जाणून घ्या कारण!

Hanuman Jayanti 2023: Like Sri Rama, Hanumanta attains divinity but why? The answer is found in Kishkindha Kanda! | Hanuman Jayanti 2023: श्रीरामाप्रमाणे हनुमंताला देवत्त्व प्राप्त झाले पण का? त्याचे उत्तर सापडते किष्किंधाकांडात!

Hanuman Jayanti 2023: श्रीरामाप्रमाणे हनुमंताला देवत्त्व प्राप्त झाले पण का? त्याचे उत्तर सापडते किष्किंधाकांडात!

googlenewsNext

देशभरात श्रीराम नवमी साजरी झाल्यानंतर सर्वांनाच आता वेध लागले आहेत हनुमान जन्मोत्सवाचे! यंदा ६ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. हा उत्सव करताना आपल्या मनात विचार येतो, की श्रीराम प्रभूंचा जन्मदिवस तोच भरत, लक्ष्मण, शत्रुघ्नचा, तरीदेखील त्यांना जे देवपण प्राप्त झाले नाही ते हनुमंताला का झाले असावे? त्याचा जन्मोत्सव का? वाचा त्याचे कारण... 

महर्षी वाल्मिकींच्य रामायणात श्रीरामाच्या नंतर हनुमंताचेच व्यक्तिमत्त्व आपले चित्त वेधून घेते. जन्मत: सूर्यबिंबाकडे गरुडझेप घेणारा बाल हनुमान हा एक `न भूतो न भविष्यति' असा चमत्कार आहे. असा आगळा पराक्रम केवळ महाकपि हनुमंतच करू जाणे.

हनुमंत हा अंजनी नामक वानरीचा पुत्र, परंतु तो वायूच्या कृपा प्रसादाने झालेला असल्याने त्याच्या अंगी असा जगावेगळा पराक्रम करण्याचे सामर्थ्य निर्माण झाले. या हनुमंताला त्याच्या बालपणी अनेक देवदेवतांनी वेगवेगळे वर दिले. त्यामुळे तो सर्वांनाच अजिंक्य झाला. परंतु पुढे आपल्या बालभावानुसार तो ऋषींच्या आश्रमात जाऊन नाना प्रकारची दांडगाई करू लागला. 

शेवटी ऋषींनी आपले नेहमीचे हत्यार बाहेर काढले. त्यांनी हनुमंताला शाप दिला, की `तुझ्या बलाची कुणीतरी आठवण करून देईपर्यंत आपल्या बलाचे ज्ञान तुला मुळीच होणार नाही!'

या शापामुळे हनुमंताला आपल्या बलाचा विसर पडला आणि इकडे ऋषींची तपश्चर्याही निर्वेधपणे सुरू झाली. परंतु पुढे समुद्र उल्लंघनाच्या वेळी जांबुवंताने हनुमंताला त्याच्या बलाची आठवण करून दिली. 

हा प्रसंग `किष्किंधाकांडात' वर्णन केला असून इथूनच पुढे हनुमंताच्या बलदंड व्यक्तिमत्त्वाचा फुलोरा खऱ्या अर्थाने फुलू लागतो. त्याच्या अंगाचे एक एक गुण प्रकट होऊ लागतात आणि पाहता पाहता त्याची व्यक्तिरेखा हिमालयाच्या उत्तुंग शिखराप्रमाणे भव्य दिव्य बनते आणि रामायणाच्या अखेरीस तर त्याला `देवत्त्व' प्राप्त होते.

श्रीरामाच्या परिवारात लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे, जांबुवान, सुग्रीव, बिभीषण यासारखी कितीतरी पराक्रमी आणि गुणी मंडळी आहेत, परंतु श्रीरामाप्रमाणे देवत्त्व प्राप्त झाले, ते हनुमंताला! त्यामुळे श्रीरामाची मंदिरे आपल्याला आढळतात, तशीच हनुमंताचीही आढळतात. श्रीरामाच्या परिवारातील अन्य कुणाचीही आढळत नाहीत, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.

Web Title: Hanuman Jayanti 2023: Like Sri Rama, Hanumanta attains divinity but why? The answer is found in Kishkindha Kanda!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.