हनुमंत रामाची उपासना करतात, आपण हनुमंताची उपासना करूया; त्यासाठी काही सिद्धमंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 08:00 AM2021-05-08T08:00:00+5:302021-05-08T08:00:11+5:30

मंत्रांची शक्ती अनुभवायची असेल तर दृढ श्रद्धा असावी लागते, प्रचिती आपोआप येते.

Hanumantha worships Rama, let us worship Hanumanta; Some Siddha Mantra for that! | हनुमंत रामाची उपासना करतात, आपण हनुमंताची उपासना करूया; त्यासाठी काही सिद्धमंत्र!

हनुमंत रामाची उपासना करतात, आपण हनुमंताची उपासना करूया; त्यासाठी काही सिद्धमंत्र!

Next

हनुमंताची भक्ती सर्वपरिचित आहे. पण भक्ताची भक्ती करणे हा देखील सुखद अनुभव असतो. हनुमंताप्रमाणे शक्ती, युक्ती आणि बुद्धी हवी असेल, तर पुढील प्रभावी मंत्राचा मनोभावे जप करावा. 

दररोज स्नान केल्यानंतर किंवा भोजनापूर्वी बारा वेळा महामंत्राचा जप केल्यास ईप्सित साध्य होते. याशिवाय हनुमानाचे अनेक सिद्धमंत्र आहेत. त्यापैकी काही असे-

नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा!'
या मंत्राच्या १०८ जपाने आरोग्य व लक्ष्मीची प्राप्ती होते. इतकेच नव्हे तर अकस्मात उद्भवणारी अरिष्टे आणि आपत्तीही दूर होते. त्यासाठी

तप्तचामीकरनिभं भीघ्नं संविहितांजलिम
चलत्कुण्डदीप्तास्यं पद्माक्षं मारुति स्मरेत

या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. अणिमा, गरिमा, ईशित्व, वशित्व, प्राकाम्य इ. अष्टसिद्धींच्या प्राप्तीसाठी 

हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट
या द्वादशाक्षरी मंत्राचा एक लाख जप करावा. सौख्यप्राप्तीसाठी 

वामे शैलं वैरिभिदं विशुद्धं टंकमन्यत:
दधानं स्वर्णवर्णंच घ्यायेत कुंडलिनं हरिम

या मंत्राचा १०८ वेळा याप्रमाणे सलग ९० दिवस जप करावा.

अंजनीगर्भसंभूत कपीन्द्र सचिवोत्तम,
रामप्रिय नमस्तुभ्यं हनुमत रक्ष सर्वदा।

स्वसंरक्षणासाठी वरील मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

मर्कटेश महोत्साह सर्वशोक विनाशन,
शत्रूने संहर मां रक्ष श्रियं दापय मे प्रभो।

शत्रू पराभवासाठी वरील मंत्राचा १०८ वेळा जप करावा. 

Web Title: Hanumantha worships Rama, let us worship Hanumanta; Some Siddha Mantra for that!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.