आनंद तरंग: जीवनात होणारे बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 02:51 AM2020-08-27T02:51:10+5:302020-08-27T02:51:23+5:30
सतत परिवर्तित होणाºया ‘नाम’चेही आणि मनात येणाºया व सतत परिवर्तित होणाऱ्या विचारांचेही ध्यान करतो़ कधी-कधी साधक आपले ध्यान अस्तित्वाच्या भौतिक पक्षावर केंद्रित करतो,
फरेदुन भुजवाला
भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणुकीत ज्यांना चार ‘आर्य सत्य’ म्हटले गेले आहे, त्यात दु:ख सत्य हे प्रथम क्रमांकावर आहे़ कारण जेव्हा तुम्ही दु:खाच्या सूक्ष्म रूपाचा अनुभव करता, त्या दु:खाला तुम्ही इच्छा असली तरी बाहेर काढू शकत नाही़ क्षणासाठीही नाही तेव्हा खरोखर तुमच्यात भय जागते़ तुम्हाला वैराग्य प्राप्त होते़ नाम-रूप हे तुमच्या अस्तित्वाचे आधारभूत तत्त्व आहे़ तुम्ही दु:खाच्या नि:स्सरणासाठी, दु:खमुक्त होण्यासाठी, दु:खातीत होण्यासाठी, निर्वाण प्राप्त करण्यासाठी मार्ग शोधू लागता़ तेव्हा इतकी साधना कराल की निर्वाणिक अवस्थेची प्राप्ती कराल, आंतरिक शांती प्राप्ती कराल़; परंतु दैनंदिन जीवनातही जेव्हा तुम्ही अनित्यतेची स्मृती कायम ठेवाल, त्याप्रती जागरूक राहाल, तर इतका अनुभव करालच की तुमच्यात जे परिवर्तन होत आहे, ते चांगल्यासाठीच होत आहे- शारीरिक रूपाने आणि मानसिक रूपानेही़ विपश्यना करताना केवळ साधक न राहता परिवर्तित होणाऱ्या ‘रूप’चे ध्यान करतो, तर सतत परिवर्तित होणाºया ‘नाम’चेही आणि मनात येणाºया व सतत परिवर्तित होणाºया विचारांचेही ध्यान करतो़ कधी-कधी साधक आपले ध्यान अस्तित्वाच्या भौतिक पक्षावर केंद्रित करतो, म्हणजे रूपाच्या सतत परिवर्तित होणाºया स्वभावावर अर्थात रूपाच्या अनित्य स्वभावावर, तर कधी-कधी विचारात होणाºया म्हणजे मनात होणाºया परिवर्तनावर ध्यान केंद्रित करतो़ म्हणजे नाम व रूपाच्या सतत परिवर्तित
होणाºया स्वभावावर अर्थात नाम व रूपाच्या अनित्य स्वभावावऱ जेव्हा कोणी रूपाच्या अनित्यतेवर ध्यान करतो, तेव्हा त्याचवेळी होणाºया नामाच्या अनित्यतेवरही ध्यान करतो आणि पाहतो हेही बदलत आहे, असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांचे गुरू विपश्यनाचार्य सयाजी उ बा खिन हे आपल्या प्रवचनातून सांगत असत़ त्यांचे प्रवचन साधकांसाठी नेहमी प्रेरणादायी राहिले.