हृदयविकाराचा त्रास आहे? मग उपचारांना वैद्यकीय 'या' उपासनेचीही जोड द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 04:59 PM2021-07-08T16:59:56+5:302021-07-08T17:01:25+5:30
ज्याप्रमाणे आपण डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून ते सांगतात ती पथ्ये पाळतो, त्याचप्रमाणे आपल्या ऋषी मुनींवर श्रद्धा ठेवून वैद्यकीय उपचारांना उपासनेची जोड दिली, तर निरोगी आणि दीर्घायुष्य जगता येईल.
आपल्या ऋषीमुनींनी सूर्य उपासना श्रेष्ठ सांगितली आहे. कारण सूर्याचा आणि आपल्या हृदयाचा निकटचा संबंध आहे. सूर्योपासना सर्वांसाठीच फलदायी आहे, परंतु विशेषत: हृदयविकाराच्या रुग्णांनी ही उपासना केल्यास त्याचे निश्चितच सकारात्मक फळ मिळते. म्हणून वैद्यकीय उपचारांबरोबर शास्त्राने सांगितलेली सूर्योपासना आणि सोबत दिलेले काही उपाय आवर्जून केले पाहिजेत.
१) ऋग्वेदातील सौरसुक्त रोज एकवेळा वाचन करावे.
२) भविष्योत्तर पूराणातील आदित्य हृदय स्तोत्रासोबत सूर्यकवच रोज एक वेळा वाचन करावे.
३) ब्रह्मांडपुराणातील द्वितीय अध्याय श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र वाचन रोज करणे अत्यावश्यक आहे.
४) रोज सूर्योदयाच्यावेळी गायत्रीमंत्र १०८ वेळा म्हणून सूर्याची बारा नावे घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावे.
५) सूर्य देवतेला नमस्कार करून तांब्यातील शिल्लक राहिलेले पाणी हाताची गोमुद्रा करून हातावरील आयुष्यरेषेने पुढील मंत्र म्हणून तीर्थ प्राशन करावे.
अकाल मृत्यू हरणम् सर्व व्याधी विनाशनम्
सूर्योपादोक तीर्थ जठरे धारयाम्यहम्||
६) हृदय विकाराच्या व्यक्तीने गळ्यात रुद्राक्षाची आणि स्फटिक माळा वापराव्यात.
७) ओरिजनल क्रिस्टलमध्ये सूर्यप्रतिमा गळ्यात धारण करून तिचा छातीला स्पर्श होईल अशा प्रकारे ठेवावी.
ज्याप्रमाणे आपण डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून ते सांगतात ती पथ्ये पाळतो, त्याचप्रमाणे आपल्या ऋषी मुनींवर श्रद्धा ठेवून वैद्यकीय उपचारांना उपासनेची जोड दिली, तर निरोगी आणि दीर्घायुष्य जगता येईल.