सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि लग्नाळुंना चांगला जोडीदार मिळण्यासाठी काही उपयुक्त तोडगे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 11:10 AM2022-04-22T11:10:03+5:302022-04-22T11:10:32+5:30

प्रयत्नांना उपासनेची जोड मिळाली तर कामाला गती मिळते हा आजवर भाविकांना आलेला अनुभव आहे.

Here are some tips to help you get married and have a good mate! | सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि लग्नाळुंना चांगला जोडीदार मिळण्यासाठी काही उपयुक्त तोडगे!

सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि लग्नाळुंना चांगला जोडीदार मिळण्यासाठी काही उपयुक्त तोडगे!

googlenewsNext

प्रत्येक तरुणाची आपल्या लग्नाची अनेक स्वप्ने असतात. सुखी वैवाहिक जीवनाचा हा नाजूक धागा सांभाळण्याचा प्रत्येक जोडप्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मात्र असे असूनही अनेक वेळा वैवाहिक जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. ज्योतिषशास्त्रानुसार पती-पत्नीची ग्रहस्थिती बिघडणे, वास्तू दोष निर्माण होणे, परस्पर समजूतदारपणा नसणे यासह अनेक कारणे असू शकतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही सोपे तोडगे दिले आहेत, त्यांचा अवलंब केल्याने वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते.

तुमच्या वैवाहिक जीवनात एकएक वादग्रस्त परिस्थिती उद्भवली असेल तर शुक्रवारी मातीच्या दिव्यात कापराचे दोन तुकडे टाका. दिवा प्रज्वलित करा.  यानंतर, संपूर्ण घरात दाखवा आणि तो दिवा बाहेर ठेवा. असे सलग काही दिवस सातत्याने करा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वैवाहिक जीवनातील गोडवा पुन्हा वाढेल.

जोडीदाराची तब्येत वरचेवर बिघडत असेल, तर दर शुक्रवारी वाटीभर कणिक, डाळ, तांदूळ, गूळ असा कोरडा शिधा गरजू व्यक्तीला दान करा. त्याचे आशीर्वाद लाभतील आणि घराचे आजारपण दूर होईल. 

घरातील कलह दूर करण्यासाठी शुक्रवारी देवीच्या मंदिरात जाऊन तिची विधिवत पूजा करावी. खणा नारळाने ओटी भरावी. एखाद्या गरीब महिलेला शिधा, पैसे दान करावेत. तसे केल्याने देवीच्या आशीर्वादाने घरात सदैव सुख-शांती नांदते.

लग्नापूर्वी हे उपाय करा

जर तुम्ही चांगला जीवनसाथी शोधत असाल तर शुक्रवारी देवी, हनुमान यांच्याबरोबरच शुक्राचार्यांच्या या मंत्राचा १०८ वेळा जप करा - 'ॐ द्रं द्रीं द्रौंस: शुक्राय नमः' यासोबतच मंदिरात जाऊन यथाशक्ती दान करा. यामुळे तुम्हाला एक चांगला जीवनसाथी मिळेल आणि वैवाहिक जीवन आनंदी होईल.

मुलीचे वैवाहिक जीवन सुखी राहावे म्हणून लग्नात तिच्या पाठ्वणीच्या वेळी किंवा ती माहेरी आल्यावर तांब्याभर पाणी तिच्यावरून ओवाळून आड रस्त्यावरील एखाद्या झाडाला टाकावे. 

Web Title: Here are some tips to help you get married and have a good mate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.