Holi 2022: धनप्राप्तीसाठी आणि वास्तुदोष घालवण्यासाठी होळीच्या दिवशी करा 'हे' सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 05:27 PM2022-03-11T17:27:00+5:302022-03-11T17:27:34+5:30

Holi 2022: यंदा १७ मार्च रोजी होळी आहे. त्यादृष्टीने उपाय वाचून पूर्वतयारी करा. 

Holi 2022: Do 'these' Easy Remedy On Holi Day To Get Rid Of Money And Vastu Dosha! | Holi 2022: धनप्राप्तीसाठी आणि वास्तुदोष घालवण्यासाठी होळीच्या दिवशी करा 'हे' सोपे उपाय!

Holi 2022: धनप्राप्तीसाठी आणि वास्तुदोष घालवण्यासाठी होळीच्या दिवशी करा 'हे' सोपे उपाय!

googlenewsNext

होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी हा वाईट वृत्तीवर चांगल्याचा विजय मानला जातो. या दिवशी सर्वजण वैर विसरून एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. होळीच्या दिवशी सुख-समृद्धी मिळविण्यासाठी ज्योतिषशास्त्रात विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. त्याचबरोबर वास्तुशास्त्रात होळीशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत. यंदा १७ मार्च रोजी होळी आहे. त्यादृष्टीने उपाय वाचून पूर्वतयारी करा. 

होळीच्या दिवशी हे वास्तु उपाय करा

>>होळीच्या दिवशी घराबाहेर विविध रंगांनी युक्त रांगोळी काढा. रांगोळी काढण्यासाठी पिवळा, गुलाबी, हिरवा आणि लाल रंग वापरा. हे रंग लक्ष्मी मातेचे आवडते रंग आहेत. त्या रंगांकडे आणि तुमच्या भक्तिभावाकडे आकर्षित होऊन लक्ष्मी मातेची तुमच्या घरावर कृपा होईल आणि कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण राहील. 

>>वास्तू दोष दूर करण्यासोबतच घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी होळीच्या दिवशी घराच्या बाहेर किंवा आत हिरवीगार झाडे आणि रोपे लावू शकता. यामुळे घरातील वास्तुदोषही दूर होतील, तसेच घरातील सदस्यांमधील वादही दूर होतील.

>>वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर होळीच्या दिवशी घरात राधा-कृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करा. ही प्रतिमा बेडरूममध्ये लावा. पती-पत्नीमधील संबंध सुधारून प्रेम वाढेल.

>>होळीच्या दिवशी गणेशाची पूजाही केली जाते. पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही शिरा, पुरणपोळी किंवा कोणताही गोड पदार्थ करणार असाल तर गणपती बाप्पालाही त्याचा वेगळा नैवेद्य दाखवा. जेणेकरून गणपतीची कृपा तुमच्यावर कायम राहील.

>>होळीच्या दिवशी घर तसेच ऑफिसमध्ये उगवत्या सूर्याचे चित्र लावू शकता. या छायाचित्राचा सकारात्मक परिणाम होऊन नोकरी व्यवसायात बढती मिळेल. 

>>होळीच्या दिवशी होलिका दहन होत असताना त्यात नारळ अर्पण करा आणि आपले दुःखं, दैन्य नष्ट होऊन उत्सवाचे रंग आपल्या आयुष्यात उमटू दे अशी प्रार्थना करा. 

Web Title: Holi 2022: Do 'these' Easy Remedy On Holi Day To Get Rid Of Money And Vastu Dosha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.