Holi 2022: होलिका दहनाच्या वेळी चुकूनही 'या' 5 गोष्टी अजिबात करू नयेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 05:45 PM2022-03-15T17:45:22+5:302022-03-15T17:45:40+5:30
होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते. जेव्हा हिरण्यकशिपूची बहीण होलिकाने भगवान विष्णूचा भक्त प्रल्हादला आगीत जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा होलिका जळून राख झाली आणि प्रल्हादला काहीही झाले नाही, असं मानलं जातं.
होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते. जेव्हा हिरण्यकशिपूची बहीण होलिकाने भगवान विष्णूचा भक्त प्रल्हादला आगीत जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा होलिका जळून राख झाली आणि प्रल्हादला काहीही झाले नाही, असं मानलं जातं. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा होती. तेव्हापासून होलिका दहनाची परंपरा सुरू झाली. होलिका दहन हा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. यावेळी होलिका दहन 17 मार्च 2022 च्या रात्री केले जाईल. ज्योतिषांच्या मते, होलिका दहनाच्या वेळी काही चुका कधीच करू नयेत, अन्यथा त्याचा फटका नंतर भोगावा लागू शकतो.
Holi 2022: होलिका दहनाच्या वेळी 'या' चुका करू नका
१. होलिकेच्या अग्निला जळत्या शरीराचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे कोणत्याही नवविवाहित जोडप्याने ही अग्नी पाहू नये. तो अशुभ मानला जातो. त्यामुळे त्यांच्या नवीन वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.
२. होलिका दहनाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला उधार देऊ नका. असे केल्याने घरामध्ये येणाऱ्या समृद्धीवर परिणाम होतो आणि आर्थिक समस्या वर्षभर राहतात. या दिवशी कर्ज घेणे देखील टाळावे.
३. जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य असाल तर तुम्ही होलिकेला अग्नी देणे टाळावे. ते शुभ मानले जात नाही. एक भाऊ आणि एक बहीण असल्यामुळे होलिका दहनाचा अग्नी भाऊच पेटवू शकतो.
४. होलिका दहनासाठी पिंपळ, वट किंवा आंब्याचे लाकूड कधीही वापरू नये. ही झाडे दैवी मानली जातात, त्याचप्रमाणे या ऋतूत नवीन कळ्या येतात, अशा परिस्थितीत त्यांना जाळल्याने नकारात्मकता पसरते. त्याच्या जागी, आपण एरंडेल झाडाचे लाकूड किंवा शेणी वापरू शकता.
५. होलिका दहनाच्या दिवशी आईचा आशीर्वाद अवश्य घ्या. आईला एखादी भेटवस्तू द्या, ते कृष्णाला प्रसन्न करते आणि त्याची कृपा तुमच्यावर राहते. कोणत्याही महिलेचा अपमान करू नका.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)