Holi 2023: होळीच्या निमित्ताने आवर्जून करा लक्ष्मीची पूजा; जाणून घ्या 'शुभ' कालावधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 12:53 PM2023-03-06T12:53:16+5:302023-03-06T12:54:27+5:30

Astrology Tips: आज होळी आणि फाल्गुन पौर्णिमा! लक्ष्मी उपासनेची सुवर्ण संधी; आजच्या दिवशी सुमुहूर्तावर केलेली लक्ष्मीपूजा ठरते अधिक लाभदायी... 

Holi 2023: Importance of Lakshmi worship on the occasion of Holi; Know the 'auspicious' moment!! | Holi 2023: होळीच्या निमित्ताने आवर्जून करा लक्ष्मीची पूजा; जाणून घ्या 'शुभ' कालावधी!

Holi 2023: होळीच्या निमित्ताने आवर्जून करा लक्ष्मीची पूजा; जाणून घ्या 'शुभ' कालावधी!

googlenewsNext

दिनांक ६ मार्च २०२३ रोजी होळी आणि फाल्गुन पौर्णिमा आहे. होळीची पूजा करण्याची प्रथा आपण पाळतोच. त्याबरोबरीने लक्ष्मी प्राप्तीसाठी फाल्गुन पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजाही करा आणि भरघोस लाभ मिळवा. 

६ मार्च रोजी सायंकाळी ४. १७ मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार असून ७ मार्च रोजी सायंकाळी ६. ९ मिनिटांपर्यंत पौर्णिमेची तिथी असणार आहे. पौर्णिमा ही लक्ष्मी मातेची आवडती तिथी. अशातच फाल्गुनी पौर्णिमेला आपण होलिका दहन करतो. त्यात आळस, अंधश्रद्धा, अविवेक, अनैतिकतेरुपी असणारी अलक्ष्मी जळून जावी अशी प्रार्थना करतो. जेव्हा घरातून अलक्ष्मी काढता पाय घेते, तेव्हाच लक्ष्मीचे वास्तूत आगमन होते. तिने यावे, स्थिर राहावे आणि वृद्धिंन्गत व्हावे, यासाठी फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला लक्ष्मी पूजेचे महत्त्व सर्वार्थाने वाढते. 

अशी करावी लक्ष्मीपूजा: ही पूजा सोमवारी सायंकाळी करावी. स्नान करून शुचिर्भूत व्हावे. धुतलेले वस्त्र परिधान करावे. देव्हाऱ्यातील अन्नपूर्णेची किंवा कुलदेवीची हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करावी. पाटावर रांगोळी काढावी. त्यावर नैवेद्य ठेवावा. त्याच्याभोवती पाणी फिरवून लक्ष्मीला तो अर्पण करावा. शांतपणे बसून आपल्याला येत असलेली लक्ष्मीची उपासना करावी. महालक्ष्मी अष्टक, श्रीसूक्त, महालक्ष्मी मंत्र म्हणावेत किंवा पाठ नसल्यास व्हिडीओ लावून शांत चित्ताने श्रवण करावेत. हीच उपासना मंगळवारी सकाळीदेखील करावी.

या उपासनेमुळे लक्ष्मी संतुष्ट होते आणि भक्तांना शुभाशीर्वाद देते. त्यामुळे होळीच्या आणि फाल्गुन पौर्णिमेच्या औचित्याने ही उपासना चुकवू नका. लक्ष्मीपूजा करा आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करा. 

Web Title: Holi 2023: Importance of Lakshmi worship on the occasion of Holi; Know the 'auspicious' moment!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.