Holika Dahan 2021: आजचा दिवस होलिका दहनाचा; होळी पेटवण्याचा मुहूर्त अन् योग्य पद्धत काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 09:46 AM2021-03-28T09:46:04+5:302021-03-28T09:51:20+5:30
Holika Dahan 2021 Happy Holi : . जो होळीची पूजा करून ती पेटवणार आहे, त्याने संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुचिर्भूत व्हावे. होळीच्या पूजेचा मान ज्येष्ठ किंवा सन्माननीय व्यक्तीला दिला जातो.
फाल्गुन पौर्णिमा काल २७ मार्च २०२१ रोजी उत्तररात्रौ ०३ वाजून २७ मिनिटांनी सुरू झाली असून, रविवार, २८ मार्च २०२१ रोजी उत्तररात्रौ १२ वाजून १८ मिनिटांनी फाल्गुल पौर्णिमा समाप्त होईल. भारतीय परंपरेत सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. तसेच होळीचा सणाच्या दिवशी रात्री होलिकादहन (Holi 2021) केले जात असल्यामुळे आज २८ मार्च २०२१ रोजी हा सण साजरा केला जात आहे.
होलिका दहनाची (Holika Dahan 2021) शुभवेळ ?
होलिका दहन तारीख - २८ मार्च, रविवार
होलिका दहन शुभ वेळ- संध्याकाळी ६: ३६ मिनिट ते रात्री ८: ५६ या वेळेत
होळी ( रंगपंचमी )- २ मार्च, सोमवार
होलिका दहन (Holika Dahan ) कसे केले जाते
फाल्गुन पौर्णिमेला भद्रा नक्षत्र संपल्यानंतर होळी पेटवावी. मात्र दिवसा कधीही होळी पेटवू नये. होळी शक्यतो गावामध्ये किंवा गावाबाहेर सार्वजनिक स्वरूपात पेटवण्याची प्रथा आहे. ज्या ठिकाणी होळी पेटवायची असेल, ती जागा सकाळीच केर काढून पाणी शिंपडून स्वच्छ करून घ्यावी. नंतर त्या जागी झाडाच्या वाळलेल्य फांद्या, काटक्या, गोवऱ्या ह्यांची ढीग रचून ठेवावा. मध्ये एक फांदी उभी करावी. जो होळीची पूजा करून ती पेटवणार आहे, त्याने संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुचिर्भूत व्हावे. होळीच्या पूजेचा मान ज्येष्ठ किंवा सन्माननीय व्यक्तीला दिला जातो.
होळी कशी साजरी केली जाते
पूजा करणाऱ्या व्यक्तीने देश, कालाचा उच्चार करून 'ढुंढा राक्षसीकडून होणाऱ्या पीडांच्या परिहारार्थ या होलिकेचे पूजन मी करत आहे' असा जमलेल्या सर्वांच्या वतीने संकल्प करावा. नंतर होळीची षोडशोपचारे पूजा करावी. तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. नंतर ती होळी पेटवावी. काही ठिकाणी होळी पेटवण्यापूर्वी पूजा करतात, तर काही ठिकाणी पेटवून झाल्यानंतर करतात. परंतु होळी प्रदिप्त करण्यापूर्वी पूजा करणे सुरक्षेच्या दृष्टीने उचित ठरते. होळी पेटवल्यानतर तिला सर्वांनी तीन प्रदक्षिणा घालून मुलांच्या रक्षणार्थ तिची प्रार्थना करून अर्घ्य द्यावे. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा, श्रीफळ वहावे.
महाराष्ट्रात या दिवशी रंगांची उधळण पहायला मिळते. ब्रज ची होळी जगभर प्रसिद्ध आहे. ब्रज मधील होळीचा सण महिनाभर चालू असतो. मध्य प्रदेशातील मालवा क्षेत्राबद्दल बोलताना रंगपंचमी होळीच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील लोकही या दिवशी रंगपंचमी साजरे करतात आणि एकमेकांना कोरडे गुलाल लावतात. यंदा कोरोनाच्या संकटामुळे साध्या पद्धतीनं सर्वत्र होळी साजरी केली जाणार आहे.