आपल्या मुलांचे मित्र कसे व्हाल, सांगत आहेत प्रल्हाद वामनराव पै, आजच्या live चर्चासत्रात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 06:39 PM2020-12-18T18:39:39+5:302020-12-18T18:40:28+5:30
'आनंदी पालकत्व' या चर्चासत्रातून आपल्यालाही त्यांच्याकडून यशस्वी जीवनाची अनेक सूत्र जाणून घेता येतील. या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि १८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनलला लॉग इन करा.
मुलांशी पटत नाही की मुलांचे पटत नाही, की मुलांनी वागलेले पटत नाही? या तीनही प्रश्नांचे उत्तर आहे, संवादाचा अभाव. मुलांशी जुळवून कसे घ्यावे, ही आजच्या समस्त पालक वर्गाची समस्या आहे. आजच्या स्पर्धेच्या काळात आपले पाल्य मागे राहू नये, त्याला सुख सुविधांची कमतरता भासू नये, म्हणून पालक जीवाचा आटापिटा करतात. या धकाधकीत मुलांशी आपुलकीचा संवाद राहून जातो आणि छोटीशी वाटणारी भेग नात्यांमध्ये मोठी दरी निर्माण करते. अशा वेळी गरज भासते, ती नात्यांना मलमपट्टी करण्याची. पण ती नेमकी कशी करायची, हे शिकवण्यासाठी ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै आज रात्री ८ वाजता 'आंनदी पालकत्व' या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. अभिनेत्री नेहा शितोळे, समस्त पालकांचे प्रतिनिधित्व करून प्रश्न मांडणार आहेत. आपणही या चर्चासत्रात सहभागी होऊ शकता व श्री. पै यांच्याकडून प्रश्नांची उकल करून घेऊ शकता.
श्री. प्रल्हाद पै हे आपल्याला ज्येष्ठ निरुपणकार म्हणून परिचित आहेत. ते सद्गुरू श्री वामनराव पै यांचे चिरंजीव आहेत. जीवनविद्या तत्वज्ञानाचे ही सद्गुरू वामराव पै यांनी सुरु करून दिलेल्या संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. वडिलांप्रमाणे प्रल्हाद पै यांनाही तत्वज्ञानाची आवड आहे. कारण तत्वज्ञान हे वैज्ञानिक, व्यावहारिक आणि प्रत्येक जीवनात प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते. जीवनविद्या तत्वज्ञान हे मानसशास्त्र, परजीवी विज्ञान आणि मेटाफिजिक्सचे उत्कृष्ट संयोजन आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून समुपदेशन सत्रे घेतली आहेत आणि जीवनविद्या तत्वज्ञानाची तत्त्वे लागू करून सामान्य माणसाचे जीवन उन्नतीत आणण्यास मदत केली आहे.
त्यामुळे आजच्या या अत्यंत नाजूक प्रश्नाचा तोडगा मिळवण्यासाठी 'आनंदी पालकत्व' या चर्चासत्राचा आपणही अवश्य लाभ घ्या आणि १८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनलला लॉग इन करा.