प्रपंच आणि परमार्थाची सांगड कशी घालावी; जाणून घ्या स्वामी शांतिगिरीजी महाराजांकडून आजच्या live सत्रात!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 13, 2021 08:00 AM2021-02-13T08:00:00+5:302021-02-13T08:00:07+5:30

ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या अध्यात्ममार्गाच्या तीन वाटा आहेत. तिथे जाण्याचा मार्ग सुकर करून सांगणार आहेत, स्वामी शांतिगिरीजी महाराज. आजचे live सत्र जरूर ऐका.

How to combine Prapancha and Parmartha; Find out from Swami Shantigiriji Maharaj in today's live session! | प्रपंच आणि परमार्थाची सांगड कशी घालावी; जाणून घ्या स्वामी शांतिगिरीजी महाराजांकडून आजच्या live सत्रात!

प्रपंच आणि परमार्थाची सांगड कशी घालावी; जाणून घ्या स्वामी शांतिगिरीजी महाराजांकडून आजच्या live सत्रात!

googlenewsNext

प्रपंचात राहून सन्यस्त जीवन जगणे शक्य आहे का? नक्कीच आहे. सर्व संतांचे जीवन हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे.  प्रपंचात राहूनही परमार्थ करता येतो. संसाराप्रती आसक्ती कमी करून वैराग्य अंगी बाणता येते. परंतु, तसे करणे वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी हवा मनाचा निग्रह आणि गुरूंचे मार्गदर्शन. या दोन्ही गोष्टींची जोड असेल, तरच ज्ञान, भक्ती आणि वैराग्य प्राप्त करता येते. याच विषयावर अधिक माहिती देण्यासाठी जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज आपल्या भेटीला येत आहेत. १३ फेब्रुवारी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर live कार्यक्रमात आपण त्यांचे विचार ऐकू शकता. 

उत्तम समाजसेवक आणि अध्यात्मिक गुरु अशी स्वामीजींची ख्याती आहे. साधारणतः १९७५-७६ मध्ये शांतिगिरीजी बाबांनी जे घर सोडले ते आजतागायत आहे. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.' या उक्तीप्रमाणे शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य सुरू केले. पहिल्यापासूनच शांतिगिरीजी बाबा जनार्दन बाबांचे आवडते शिष्य होते. सन १९८९ मध्ये जनार्दन बाबांचे महानिर्वाण झाले. आणि सोडशी सोहळ्यात जनार्दन बाबांच्या उत्तराधिकारी पदाची शाल अनेक मान्यवरांच्या साक्षीने आणि शंभू पंचनाम जुना आखाड्याच्या साधूंच्या उपस्थितीत शांतिगिरीजी बाबांच्या अंगावर चढवली. परंतु आजही काही नतभ्रष्ट लोक हे मान्य करायला तयार नाही. त्यानंतर ही शांतिगिरीजी बाबांना अनेक प्रकारचे त्रास काही लोकांनी दिला. प्रसंगी मारायचा प्रयत्न झाला. परंतु जनार्दन बाबांनी दिव्य दृष्टी दिलेल्या शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य थांबवले नाही. या सर्वांतून शांतिगिरीजी बाबांनी संयमाने आणि धैर्याने मार्ग काढत बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ती आजतागायत सुरू आहे. 

त्यागाचा अर्थ कळल्याशिवाय वैराग्य अंगात बाणता येणार नाही, शांतिगिरीजी महाराजांनी ती अनुभूती स्वतः घेतली, म्हणून ते अधिकारवाणीने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. आपणही जरूर ऐका 'ज्ञान, वैराग्य, आरोग्य' या विषयावरील live चर्चासत्र. १३ फेब्रुवारी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर!

Web Title: How to combine Prapancha and Parmartha; Find out from Swami Shantigiriji Maharaj in today's live session!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.