स्वतःचे परिवर्तन करण्याचा एक शक्तीशाली मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 09:37 AM2020-04-25T09:37:02+5:302020-04-25T09:38:55+5:30
अतिशय थोड्या माणसांनी स्वतःची प्रतिमा जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. इतर सर्वांनी ते ज्या ज्या प्रकारच्या बाह्य वृत्ती, परिस्थितीत ते पडले त्यानुसार त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे.
प्रत्येक मनुष्य, जाणतेपणे किंवा अजाणता, आयुष्याच्या प्रक्रीयेतुन वाटचाल करताना, स्वतःची एक विशिष्ट अशी प्रतिमा किंवा व्यक्तिमत्व तयार करतो. तुम्ही स्वतःमध्ये निर्माण केलेली या प्रतिमेचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाहीये. त्याचा तुमच्या अस्तित्वाशी, तुमच्या आंतरिक स्वरूपाशी काहीही संबंध नाही. ही तुम्ही, बहुतेकदा अजाणतेपणे तयार केलेली एक विशिष्ट अशी प्रतिमा आहे. प्रत्येकाची ते जे कोणी आहेत त्याबद्दलची स्वतःची एक प्रतिमा आहे. अतिशय थोड्या माणसांनी स्वतःची प्रतिमा जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. इतर सर्वांनी ते ज्या ज्या प्रकारच्या बाह्य वृत्ती, परिस्थितीत ते पडले त्यानुसार त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे.
तर मग, आपण जाणीवपूर्वक, आपल्याला जस असावंस वाटतं तशी एक नवीन स्व-प्रतिमा का निर्माण करत नाही? तुम्ही जर पुरेसे बुद्धिमान असाल, तर तुम्ही तुमची प्रतिमा, एक संपूर्ण नवीन प्रतिमा, अगदी तुम्हाला हवी त्याप्रमाणे नव्याने निर्माण करू शकता. हे शक्य आहे. पण तुमच्या जुन्या प्रतिमेमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही तयार असायला हवं. हे नाटक नाही. अजाणतेपणे कृती करण्यापेक्षा, तुम्ही जाणीवपूर्वक कृती करा. तुम्हाला सर्वोत्तम प्रकारे साथ देणारी प्रतिमा तुम्ही निर्माण करू शकता, एक अशी प्रतिमा जी तुमच्या भोवताली सर्वाधिक सुसंवाद, सुसंगत असेल, अशी प्रतिमा ज्यात कमीतकमी घर्षण, संघर्ष असेल. तुम्ही एक अशी प्रतिमा निर्माण करा जी तुमच्या आंतरिक स्वरुपाच्या अतिशय जवळची आहे. तुमच्या आंतरिक स्वरूपाशी सर्वाधिक सुसंगत प्रतिमा कोणती आहे असे तुम्हाला वाटते? हे लक्षात घ्या, की तुमचे आंतरिक स्वरूप अतिशय निश्चल, शांत आहे, आक्रमक नाही, परंतु अतिशय बलशाली असते. अतिशय सूक्ष्म पण तरीही अतिशय शक्तिशाली. म्हणून आता तुम्हाला तेच करणे आवश्यक आहे: तुमच्यामधील स्थूल, बोजड घटक; जसे की – तुमचा राग, तुमच्या संकुचित मर्यादा मोडून टाकायला हव्यात. आपली एक नवीन प्रतिमा निर्माण करा, जी सूक्ष्म पण अतिशय शक्तिशाली असेल.
पुढील एक दोन दिवस यावर विचार करा आणि स्वतःची एक योग्य अशी प्रतिमा तयार करा; जी तुमचे विचार आणि भावनांच्या मूलभूत स्वरूपानुसार असावी. आपण हे निर्माण करण्याआधी, अगोदर खरोखर हे तपासून पाहूया, की आपण आता जे निर्माण करणार आहोत ते आपण आज जे आहोत त्यापेक्षा अधिक चांगले आहे का. तुम्हाला व्यत्यय येणार नाहीत अशी एक वेळ निवडा. पाठ टेकवून आरामात बसा. आता डोळे मिटून घ्या आणि इतर लोकांनी तुम्हाला कसे अनुभवावे याची कल्पना करा. एक पूर्णतः नवीन मनुष्य निर्माण करा. शक्य तितक्या तपशीलांसह त्याच्याकडे पहा. ही नवीन प्रतिमा अधिक मानवी, अधिक कार्यक्षम, अधिक प्रेमळ आहे का हे पाहा.
तुम्हाला शक्य असेल तितक्या शक्तीने या प्रतिमेची कल्पना करा. तुमच्या स्वतःमध्ये ती जिवंत करा. तुमचे विचार जर पुरेसे शक्तीशाली असतील, तुमची कल्पनाशक्ती जर पुरेशी शक्तीशाली असेल, तर ती अगदी तुमची कर्म बंधने सुद्धा मोडू शकेल. तुम्हाला जसे बनायचे आहे त्याची शक्तीशाली कल्पना निर्माण करून कर्माच्या मर्यादा मोडता येऊ शकतात. तुमचे विचार, भावना आणि कृतींच्या मर्यादा पार करून पुढे जाण्याची ही एक सुवर्ण संधी आहे.