कोरोना, महागाई, अर्थव्यवस्था: ‘असे’ असेल देशासाठी आगामी वर्ष; भारताची कुंडली काय सांगते?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 06:22 PM2021-08-16T18:22:23+5:302021-08-16T18:23:39+5:30
७५ व्या स्वातंत्र्य दिनानंतर आता आगामी वर्ष भारताला कसे जाईल? देशाची कुंडली काय सांगते? जाणून घेऊया...
१५ ऑगस्ट २०२१ रोजी भारतात ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना अनेकविध योजनांची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे दुसरे मोठे भाषण ठरले. कोरोना संकटाच्या काळातही देशात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळाला. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर देशात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. देशात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे देशाची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. स्वातंत्र्य दिनानंतर आता आगामी वर्ष भारताला कसे जाईल? देशाची कुंडली काय सांगते? जाणून घेऊया...
देव-दानवांनी केलेले समुद्रमंथन भारतात नेमके कुठे झाले? पाहा, मान्यता आणि काही अद्भूत तथ्ये
एखाद्या व्यक्तीच्या जन्मानंतर त्याची कुंडली तयार केली जाते. तसेच भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यांच्या वेळेच्या आधारे देशाची ‘वर्ष कुंडली’ तयार करण्यात येते. ज्योतिषशास्त्राच्या आधारे १५ ऑगस्ट २०२१ पासूनचे आगामी वर्ष भारतासाठी कसे असू शकेल, याचा अंदाज यावरून बांधण्यात येतो. भारताच्या स्वातंत्र्याला ७४ वर्ष पूर्ण झाली असून, या दिवशीच्या आधारे तयार होत असलेली भारताची कुंडली मेष लग्नाची आहे. तर, स्वतंत्र भारताची वृषभ लग्नाची कुंडली बाराव्या स्थानी येत असल्यामुळे खर्चात मोठी वाढ होऊन आगामी वर्ष नुकसानकारक ठरू शकते, असे सांगितले जात आहे.
श्रावणात जिवतीचा कागद का पूजला जातो? जाणून घ्या महत्त्व आणि नेमका भावार्थ
कोरोना संकटामुळे खर्चात मोठी वाढ
स्वतंत्र भारताच्या यंदाच्या वर्ष कुंडलीत धन स्थानी राहू तसेच अष्टम स्थानी केतु असल्यामुळे कोरोना संकटाशी लढण्यासाठी भारताला मोठा खर्च करावा लागणार आहे. तसेच व्यय योगामुळे सरकारी तिजोरीवर याचा परिणाम स्पष्टपण दिसेल, असे सांगितले जात आहे. यासह धन स्थानाचे स्वामी शुक्र रोगकारक सहाव्या स्थानी असल्यामुळे महामारीमुळे मोठी राजकोषीय घट होऊ शकते. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा तडाखा भारताला सहन करावा लागू शकतो, असे म्हटले जात आहे.
श्रावणी सोमवारचा उपास करा आणि कायमस्वरूपी 'हा' लाभ करून घ्या!
शिक्षणासाठी मोठा खर्च
भारताच्या यंदाच्या वर्ष कुंडलीत पंचम स्थानी लग्नेश मंगळाची शिक्षणाचा कारक असलेल्या बुधशी युती करून गुरुवर दृष्टी पडत आहे. पंचमेश सूर्याची तांत्रिक शिक्षणााचा कारक शनिवर दृष्टी पडत असून, यामुळे हैष योग तयार होत आहे. यामुळे केंद्र सरकार तांत्रिक शिक्षण, विशेष करून मेडिकल आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक करू शकते. मात्र, भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्यास उत्तमोत्तम संधी आगामी वर्षांत प्राप्त होऊ शकतील, असे सांगितले जात आहे.
कोटा येथे आहे तब्बल ५२५ शिवलिंगांचे शिवालय; त्यांच्या दर्शनाने मिळते १२ ज्योर्तिर्लिंगांचे पुण्य!
सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष वाढणार!
वर्ष कुंडलीतील चतुर्थ स्थानातील चंद्राची शनिवर वक्री दृष्टी पडत असून, ही स्थिती फारशी चांगली नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष शिगेला जाऊ शकतो. एखाद्या बड्या नेत्यासोबत अनहोनी घडू शकते. तसेच महागाई वाढण्याचे संकेत असून, यामुळे सामान्य जनतेला अधिक त्रास सहन करावा लागू शकतो. मेदिनी ज्योतिषानुसार, संसद, सरकारी इमारती, मालमत्ता यांच्यात घट होण्याचे संकेत असल्याचे सांगितले जात आहे.