मनी प्लांटची दिशा अचूक असेल, तरच होईल धनलाभ; ती अचूक दिशा कोणती? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 04:44 PM2021-03-04T16:44:50+5:302021-03-04T16:45:09+5:30

वास्तुशास्त्रानुसार घराभोवती किंवा अंगणात, खिडकीत विविध प्रकारची रोपे लावली, तर ती पाहून मन प्रसन्न राहते.

If the direction of the money plant is right, then there will be money; What is that exact direction? Read on! | मनी प्लांटची दिशा अचूक असेल, तरच होईल धनलाभ; ती अचूक दिशा कोणती? वाचा!

मनी प्लांटची दिशा अचूक असेल, तरच होईल धनलाभ; ती अचूक दिशा कोणती? वाचा!

googlenewsNext

काही वर्षांपूर्वी फेंगशुई विद्येने भारतीय बाजार काबीज केला. कासव, लाफिंग बुढ्ढा, साउंड हँगिंग अशा अनेक वस्तू घराघरातून दिसू लागली. भेटवस्तू म्हणून दिली जाऊ लागली. त्यातच आणखीन एका वस्तूने शिरकाव केला. ती म्हणजे मनी प्लांट !

वास्तुशास्त्रानुसार घराभोवती किंवा अंगणात, खिडकीत विविध प्रकारची रोपे लावली, तर ती पाहून मन प्रसन्न राहते. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात, बैठकीच्या खोलीत, दिवाण खान्यात सूर्यप्रकाशाशिवाय टिकतील अशी रोपे लावण्यास सांगितले जाते. तो छोटासा कोपरा घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. याच पार्श्वभूमीवर फेंगशुईच्या माध्यमातून मनी प्लांट भारतीय अंगणात रुजू लागले. नावाप्रमाणे ते पैशाचे झाड संबोधल्यामुळे आपसूक लोकांची अपेक्षा वाढली.

अनेकांना चांगले अनुभव आले, तर अनेकांना काहीच फरक पडला नाही. काही ठिकाणी तर मनी प्लांटची वाढदेखील झाली नाही. याला वास्तुशास्त्रात काही कारणे दिली आहेत. ती कोणती, ते जाणून घेऊ - 

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण पूर्व दिशा मनी प्लांटसाठी सर्वात योग्य दिशा आहे. कारण गणपती बाप्पा या दिशेचा स्वामी आहे. या दिशेने मनी प्लांट लावले असता घरात सुख समृद्धी येते. घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि पैशांचा तुटवडा कधीच जाणवत नाही. 

उत्तर पूर्व आणि पूर्व पश्चिम दिशेला मनी प्लांट अजिबात लावू नये. त्यामुळे संपत्तीचा क्षय होतो. घरात आजारपण येते. नकारात्मक ऊर्जा खेचली जाते आणि वरचेवर कर्जबाजारी होण्याचे प्रसंग ओढवतात. 

मनी प्लांट घराबाहेर न ठेवता घरात ठेवावे. जिथे सूर्यप्रकाश मिळाला नाही, तरी किमान उजेड मिळू शकेल. मात्र मनी प्लांटची जागा अशी निवडावी, जिथे लोकांचे सहज लक्ष जाणार नाही. त्यामुळे मनी प्लांटचा उचित फायदा मिळेल आणि त्याची योग्य वाढ देखील होईल. 

मनी प्लांटची वाढ छान होत असेल, तर त्याची वेल घराच्या भिंतीवर नैसर्गिकरित्या पसरू द्यावी. त्यामुळे घरात संपत्तीची वाढ होते. 

Web Title: If the direction of the money plant is right, then there will be money; What is that exact direction? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.